कोरेगाव, पुसेगाव पोलिस ठाण्यास आयएसओ मानांकन

By Admin | Published: June 19, 2017 03:51 PM2017-06-19T15:51:56+5:302017-06-19T15:51:56+5:30

कायार्चा गौरव : निकषांची पूर्तता करण्यात दोन्ही पोलिस ठाणी यशस्वी

ISO rating in Koregaon, Pusgaon police station | कोरेगाव, पुसेगाव पोलिस ठाण्यास आयएसओ मानांकन

कोरेगाव, पुसेगाव पोलिस ठाण्यास आयएसओ मानांकन

googlenewsNext


आॅनलाईन लोकमत

कोरेगाव/पुसेगाव, दि. १९ : गतिमान व वक्तशीर कामकाजाची दखल घेऊन येथील पोलीस उपअधीक्षक कार्यालयास आयएसओ मानांकनाने सन्मानित करण्यात आले आहे. पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांच्या हस्ते उपअधीक्षक प्रेरणा कट्टे यांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.


पोलिस उपअधीक्षक कार्यालयाचे मार्च ते मे महिन्यादरम्यानचे आॅडीट करण्यात आले. कार्यालयीन स्वच्छता, रंगरंगोटी, जुना अभिलेख नाश, उर्वरित अभिलेखाची अद्ययावत मांडणी तसेच अभिलेख जतन करण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना राबविण्यात आल्या आहेत. कार्यालयात येणाऱ्या अभ्यागतांना तात्काळ सेवेसाठी १०० व १०९१ या टोल फ्री क्रमांकाची तसेच प्रतिसाद मोबाईल अ‍ॅप व निर्भया पथकाची माहिती उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

एखाद्या व्यक्तीने वषार्पूर्वीच्या कागदपत्रांची मागणी केल्यास त्यांना ते अवघ्या काही मिनिटांमध्ये उपलब्ध होणार आहेत. कार्यालयातील अधिकारी अथवा कर्मचाऱ्यांची बदली झाली तरी या कामामध्ये कोणत्याही प्रकारचा अडथळा होणार नाही, अशी परिपूर्ण व्यवस्था करण्यात आली आहे. आयएसओ मानांकनासाठी आवश्यक असलेल्या सर्व निकषांची पूर्तता करण्यात आल्याने या कार्यालयास मानांकन देऊन सन्मानित करण्यात आले आहे.

खटाव तालुक्याच्या उत्तर भागाचा रिमोट कंट्रोल असणाऱ्या व कार्यक्षेत्रातील संवेदशील गावांना नव्या वळणावर आणणाऱ्या पुसेगाव पोलिस ठाण्याला आयएओ मानांकनाने नुकतेच गौरविण्यात आले. या मानांकनांसाठी लागणाऱ्या सर्व अटींची पुर्तता करण्यात हे पोलिस ठाणे यशस्वी झाले आहे. जिल्हा पोलि सप्रमुख संदीप पाटील यांच्या हस्ते पुसेगावचे सहायक पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी प्रमाणपत्र स्विकारले.

खटाव तालुक्याच्या उत्तर भागातील व कोरेगाव विधानसभा मतदार संघातील सुमारे ५३ गावे व वाड्यावस्त्यांचे कार्यक्षेत्र असलेले भागात कायदा व सुव्यवस्था राखण्याबरोबरच पुसेगाव पोलीस ठाणे नेहमी आधुनिक व अद्ययावत राहावे, यासाठी या पूर्वीच्या दयानंद ढोमे, नंदकुमार पिंजण, उमेश तावस्कर, धनंजय पिंंगळे सुरेश शिंंदे या सहायक पोलिस निरीक्षकांनी त्या त्या वेळी वेगवेगळे समाजाभिमुख उपक्रम राबविले होते.

नुकतेच बदली होऊन गेलेले सहायक पालिस निरीक्षक राजेंद्र सावंत्रे यांनी पोलिस ठाण्यात आत्तापर्यंत झालेल्या चांगल्या गोष्टींची मोट बांधत आयएसओ मानांकनासाठी हालचाली चालू केल्या आणि पोलिस उपनिरीक्षक उध्दव वाघ, सहाय्यक फौजदार सुरेश चव्हाण, पोलिस हवालदार सुभाष काळेल, राजेंद्र कुंभार, पोलिस कर्मचारी धनाजी काळंगे, सुरज गवळी, सुहास पवार, अमोल कणसे, मुरलीधर फडतरे, सचिन माने, गणेश कदम, आनंदा गमरे, गायकवाड, जाधव, महिला पोलिस दडस, फडतरे, कोरडे यांच्यासह सर्वच पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांना मोलाची साथ दिली.

मानांकनासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व निकषांची पूर्तता करण्यात पुसेगाव पोलीस ठाणे यशस्वी झाल्यानेच त्यांना मानांकन मिळाले आहे. गावातील तसेच परिसरातील विविध स्तरातील नागरिकांनी पुसेगाव पोलिसांचे पेढे वाटून तसेच सत्कार करून कौतुक केले आहे.

Web Title: ISO rating in Koregaon, Pusgaon police station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.