जिहे-कठापूरचे पाणीपूजन युतीच करेल
By Admin | Published: January 27, 2015 10:40 PM2015-01-27T22:40:16+5:302015-01-28T00:57:41+5:30
विजय शिवतारे : वडूज येथील जाहीर मेळाव्यात व्यक्त केला विश्वास
वडूज : ‘युती शासनाच्या काळात मंजूर झालेली उरमोडी व जिहे-कठापूरची योजना पूर्ण करण्यासाठीच नियतीने युतीचे सरकार सत्तेवर आणले आहे. भविष्यात पाण्याचे पूजनही युतीच्या मंत्र्यांच्या हस्तेच होणार आहे,’ असा विश्वास पालकमंत्री विजय शिवतारे यांनी व्यक्त केले.खटाव तालुका शिवसेना व रणजितसिंंह देशमुख मित्र मंडळातर्फे वडूज बाजार पटांगणावर आयोजित नागरी सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. यावेळी आमदार शंभूराज देसाई, उपनेते नितीन बानुगडे-पाटील, माजी आमदार दिलीप येळगांवकर, शिवसेना नेते रणजितसिंंह देशमुख, जिल्हाध्यक्ष नंदकुमार घाडगे, हर्षल कदम, गणेश रसाळ, अनिल सुभेदार, संजय भोसले, माजी सभापती शिवाजी पवार, वसंत गोसावी, हणमंतराव देशमुख, युवराज पाटील, प्रताप जाधव उपस्थित होते.मंत्री शिवतारे म्हणाले, ‘युतीच्या काळात सुरू झालेल्या बहुतांशी योजना त्या-त्या काळात सुरू झाल्या आहेत. सातारा जिल्ह्यातील दोघांना जलसंपदा खाते मिळूनसुध्दा त्यांच्या संकुचीत दृष्टीकोनामुळे जिहे-कठापूर योजना रखडली आहे. याच मंडळींनी योजनेच्या कामाबाबत आंदोलनाचे इशारे देत कोल्हेकुई सुरू केली आहे. कोरेगांव व माणच्या आमदारांनी यासंदर्भात भाष्य करताना गेल्या पाच वर्षांत आपल्याकडे सर्व सत्ता असताना योजनेसाठी काय दिवे लागले याचे आत्मपरिक्षण करावे. जिहे-कठापूर, उरमोडी, टेंभू, तारळी या रखडलेल्या योजनांची कामे पूर्णत्वाकडे नेण्यासाठी आपण व्यक्तिगत लक्ष घालणार आहोत.’ दुष्काळी तालुक्यातील शेती-पाणी व इतर विकासकामासाठी पालकमंत्री शिवतारे यांनी विशेष लक्ष देण्याची मागणी रणजितसिंह देशमुख यांनी केली. ते म्हणाले, ‘प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आता सरकार बदलले आहे. हे ध्यानात ठेवावे. चांगल्या कामात आमचे प्रशासनाचे सहकार्य राहील. तर कोणाच्यातरी दबाव व सल्यावरुन चुकीची कामेङ्ककरणारांची गय केली जाणार नाही.’
येळगांवकर, आमदार देसाई, बानुगडे-पाटील, रामभाऊ घार्गे, सतीश जगताप यांची भाषणे झाली.ङ्क
यावेळी डी. आर. पाटील, मा. ए. खाडे, माजी सरपंच अनिल गोडसे, आबासाहेब देवकर, संतोष गोडसे, रणधीर जाधव, चंद्रकांत पवार, शिवाजी यादव, विजय शिंदे, परेश जाधव, बापुराव देवकर, पृथ्वीराज गोडसे, शिवाजी देवकर, संभाजी फडतरे, लक्ष्मण शिंगाडे, पोपट मोरे, धनंजय निंंबाळकर, धनाजी लवळे, कृष्णराव बनसोडे, सत्यवान कांबळे, शिवाजी सर्वगोड, अनिल देशमुख, अंकुश फडतरे, प्रा. रामचंद्र साळुंखे, शंकर फडतरे, विजय पवार, महेश गोडसे, अ.ङ्कर. कांबळे उपस्थित होते. राजूभाई मुलाणी यांनी प्रास्तविक केले.
अनिल गोडसे यांनी सूत्रसंचालन केले. पांडूरंग खाडे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)