अजिंक्यताºयासाठी मावळ्यांची ढाल !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2018 12:11 AM2018-02-03T00:11:57+5:302018-02-03T00:12:22+5:30
दत्ता यादव।
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : अजिंक्यतारा किल्ला जिंकण्यासाठी औरंगजेब किल्ल्याच्या पायथ्याशी तीन वर्षे तळ ठोकून होता. मात्र, मावळ्यांच्या जिद्दीपुढे औरंगजेबला हा किल्ला जिंकता आला नाही. आता याच किल्ल्याच्या संरक्षणासाठी साताºयातील अनेक मावळे पुढे सरसावले असून, वणवे रोखण्यासाठी ते गस्त घालणार आहेत.
अलीकडे वणवे लावण्याचे प्रकार शहर व परिसरात वाढत असून, हे कुठेतरी थांबले पाहिजे, यासाठी साताºयातील काही युवक एकवटले आहेत. केवळ चर्चा करून चालणार नाही तर आपण स्वत:हून पुढाकार घेऊन वणवे लावणाºया विघ्नसंतोषींना पकडून वनविभागाच्या ताब्यात देण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. अजिंक्यारा, यवतेश्वर आणि कास पठारावर दिवसांतून दोनवेळा गस्त घालण्याचाही निर्धार युवकांनी केला आहे.
वणव्यामुळे वनसंपदेबरोबरच जीवसृष्टीही नष्ट होऊ लागली आहे. काही वर्षांपासून अजिंक्यताºयावर विविध सामाजिक संघटनांकडून वृक्षारोपण करण्यात येत आहे. ही झाडे आताशी कुठे उमलू लागली आहेत. असे असताना विघ्नसंतोषींकडून वणवे लावले जात आहेत. या वणव्यांमुळे मोठ्या प्रमाणात जीवसृष्टीची हानी होत आहे. त्यामुळे पर्यावरणप्रेमींबरोबरच साताºयातील काही युवक अस्वस्थ झाले आहेत.
आता आपण गप्प बसायचे नाही, असा निर्धार करून संदीप मदने, बाळासाहेब पवार, राजू माने, विजय बेडेकर, लक्ष्मण जाधव, धीरज सोनवणे आणि राजू साळुंखे यांनी वणवे विझविण्यासाठी आणि संबंधितांना पकडण्यासाठी पुढाकार घेतला आहे. आपण वणवे लावणाºया युवकांवर कारवाई करू शकत नसलो तरी त्यांना पकडून वनविभागाच्या ताब्यात तरी देऊ शकतो. त्याहीपेक्षा वणवे लागणारच नाहीत, हीच खबरदारी आम्ही घेऊ, असाही
त्यांनी निर्धार केला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून हे युवक एकवटले आहेत.
विशेषत: दुपारी आणि सायंकाळच्या सुमारास वणवे लावले जातात. नेमक्या याचवेळी वेगवेगळे गट करून हे युवक गस्त घालणार आहेत. वणवा बचाव मोहीम हाती घेताना पदरमोड करून ही मोहीम यशस्वी करण्याचा मानसही युवकांनी व्यक्त केला आहे.
अनेक युवकांचे तपासले खिसे
अजिंक्यताºयावर युवकांची नेहमीच ये-जा सुरू असते. अनेकांकडून किल्ल्यावर मद्यपान केले जाते. किल्ल्यावर अनेक ठिकाणी दारूच्या रिकाम्या बाटल्या व सिगारेटची पाकिटे पडल्याचे आजही दिसून येत. या किल्यावर भर दुपारी येणाºया युवकांचे या टीमने शुक्रवारी दुपारी खिसे तपासले. काडीपेटी आणि लायटर आहेत का? हेही पाहिले. एवढेच नव्हे तर अजिंक्यताºयावर केवळ फिरू नये. येणाºया नागरिकांकडे तुम्ही वणवे लावू नका, असे सांगा, असेही हे युवक आवर्जून सांगत होते.