सातारा : मायणी अभयारण्यात बहरणार कडुनिंब, पिंपळ अन् गुलमोहर,वनविभागाचा उपक्रम : एक लाख दहा हजार वृक्षलागवडीचा संकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2018 02:58 PM2018-01-09T14:58:49+5:302018-01-09T15:04:32+5:30

मायणी व मायणी परिसरामध्ये येत्या जून महिन्यात कडुनिंब, पिंपळ, चिंच या वनौषधी वनस्पतींसह एक लाख दहा हजार रोपांची लागवड करण्यात येणार आहे. या रोपांच्या निर्मितीचे काम मायणी वन विभागात सुरू झाले असून, हा परिसर हिरवागार होणार आहे.

Meenay Wildlife Sanctuary will be developed in the Necklace, Pimpal and Gulmohar, forest Department: The resolution of one lakh ten thousand trees. | सातारा : मायणी अभयारण्यात बहरणार कडुनिंब, पिंपळ अन् गुलमोहर,वनविभागाचा उपक्रम : एक लाख दहा हजार वृक्षलागवडीचा संकल्प

मायणी व मायणी परिसरामध्ये रोपवाटिकेमध्ये रोप लावणीचे काम सुरू आहे.

Next
ठळक मुद्देमायणी अभयारण्यात बहरणार कडुनिंब, पिंपळ अन् गुलमोहर, वनविभागाचा उपक्रमएक लाख दहा हजार वृक्षलागवडीचा संकल्प

मायणी: मायणी व मायणी  परिसरामध्ये येत्या जून महिन्यात कडुनिंब, पिंपळ, चिंच या वनौषधी वनस्पतींसह एक लाख दहा हजार रोपांची लागवड करण्यात येणार आहे. या रोपांच्या निर्मितीचे काम मायणी वन विभागात सुरू झाले असून, हा परिसर हिरवागार होणार आहे.

सातारा सांगली सोलापूर जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात असलेल्या मायणी पक्षी अभयारण्यातील वनक्षेत्रांमध्ये सध्या रोपांची निर्मिती सुरू आहे. यामध्ये चिंच, बाभूळ, कडुनिंब, जंगली बाभूळ, करंज, वड, पिंपळ, अशोक व गुलमोहर आदी रोपांचा समावेश आहे. हे काम रोजगार हमीतून केले जात आहे.

मोठी रोपे साठ हजार तर लहान रोपांची संख्या पन्नास हजार आहेत. अशी एकूण एक लाख दहा हजार रोपे सध्या वन विभागामध्ये आहे. येत्या जूनमध्ये म्हणजेच पावसाळ्याच्या सुरुवातीला ही रोपे मायणी परिसरांमध्ये वनविभागाच्या हद्दीत लावण्यात येणार आहेत. तसेच परिसरांमध्ये विक्रीसाठी ही रोपे उपलब्ध करून ठेवण्यात येणार आहेत.

वनपरिक्षेत्र अधिकारी गजानन चव्हाण, वनपरिमंडल अधिकारी मोहन शिंदे, नियम क्षेत्र वनअधिकारी दादा जानकर, दादा लोखंडे तसेच वनमाळी अभिजित खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली रोपवाटिकेमध्ये रोप लावणीचे काम सुरू आहे. या रोपवाटिकेत लहान मुलांच्या खेळाचे साहित्य, गार्डन, पर्यटकांना व पक्षीमित्रांना राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

Web Title: Meenay Wildlife Sanctuary will be developed in the Necklace, Pimpal and Gulmohar, forest Department: The resolution of one lakh ten thousand trees.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.