Satara: खटावमधील ‘तो’ खून अनैतिक संबंधातून!, बारा तासांत गुन्हा उघडकीस 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2024 03:42 PM2024-04-27T15:42:51+5:302024-04-27T15:43:11+5:30

अंगणात झोपलेला असताना तरुणाच्या डोक्यात घातला दगड

Murder of Rohit Sawant in Khatav due to immoral relationship | Satara: खटावमधील ‘तो’ खून अनैतिक संबंधातून!, बारा तासांत गुन्हा उघडकीस 

Satara: खटावमधील ‘तो’ खून अनैतिक संबंधातून!, बारा तासांत गुन्हा उघडकीस 

पुसेगाव/खटाव : खटाव हद्दीतील आंबेडकरनगर येथे रोहित ऊर्फ विकास ऊर्फ विकी शांताराम सावंत (३०) याचा मंगळवारी (दि. २३) अंगणात झोपला असताना डोक्यात दगड घालून खून केला होता. याबाबत पुसेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. पुसेगाव पोलिसांनी बारा तासांतच तपास करून विकास दीपक कांबळे (२८, रा. खटाव) याला अटक केली. दरम्यान, हा खून अनैतिक संबंधातून झाल्याचे तपासात उघड झाले आहे.

सहायक पोलिस निरीक्षक आशिष कांबळे यांनी दिलेली माहिती अशी की, रोहित ऊर्फ विकास ऊर्फ विकी सावंत हा मंगळवारी अंगणात झोपला असताना कोणीतरी डोक्यात दगड घालून खून केल्याची फिर्याद विकास सावंत याची आई सुमित्रा यांनी पुसेगाव पोलिस ठाण्यात दिली होती. त्यावरून गुन्हा दाखल केला होता.

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस अधीक्षक समीर शेख, अपर पोलिस अधीक्षक आँचल दलाल, उपविभागीय पोलिस अधिकारी सोनाली कदम, पोलिस निरीक्षक अरुण देवकर, सहायक पोलिस निरीक्षक आशिष कांबळे यांनी घटनास्थळी भेट दिली. वरिष्ठांच्या सूचनांनुसार पोलिस निरीक्षक अरुण देवकर, सहायक पोलिस निरीक्षक आशिष कांबळे, स्थानिक गुन्हे शाखेकडील सहायक पोलिस निरीक्षक पृथ्वीराज ताटे व पोलिस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे यांचे अधिपत्याखाली पथक तयार केले होते.

गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास करताना पथकास विकास सावंत याचे एका महिलेशी अनैतिक संबंध असल्याची माहिती मिळाली. तसेच त्या महिलेचे आंबेडकरनगर खटाव येथील आणखी एका व्यक्तीशी अनैतिक संबंध असल्याचीही माहिती मिळाली. कौशल्यपूर्वक तपासाचा वापर करून विचारपूस केली असता संशयित विकास कांबळे याने महिलेशी विकासचे अनैतिक संबंध असल्याचा राग मनात धरून विकासचा खून केल्याचे सांगितले.

या कारवाईत पोलिस निरीक्षक अरुण देवकर, सहायक पोलिस निरीक्षक आशिष कांबळे, सहायक पोलिस निरीक्षक पृथ्वीराज ताटे, पोलिस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे, तानाजी माने, पोलिस उपनिरीक्षक सुधीर येवले यांनी सहभाग घेतला.

Web Title: Murder of Rohit Sawant in Khatav due to immoral relationship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.