ग्राहकाच्या वीज बिलात २०० युनिटचा जादा ‘प्रकाश’ : सातारा वीज वितरण कंपनी लूट करीत असल्याच्या तक्रारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2017 12:20 AM2017-12-07T00:20:40+5:302017-12-07T00:20:47+5:30
सातारा : वीज वितरण कंपनीच्या अजब कारभाराचे नमुने अनेकदा समोर येत आहेत.
सातारा : वीज वितरण कंपनीच्या अजब कारभाराचे नमुने अनेकदा समोर येत आहेत. वीज ग्राहकांना लुटण्याचा एकमेव अजेंडा सुरू आहे. गोडोलीतील घरगुती वीज वापर करणाºया एका ग्राहकाला वापरलेल्या विजेपेक्षा तब्बल २०० युनिट ज्यादा वीज आकारून वेगळा प्रकाश वीज कंपनीने पाडला आहे.
गोडोली येथील माधुरी खंडूजी कुलकर्णी यांना काही दिवसांपूर्वी वीज बिल मिळाले. या बिलावर मीटरच्या फोटोमध्ये ३२४१ असे रिडिंग स्पष्ट दिसते. मात्र त्यावर असणाºया चालू रिडिंगच्या कॉलममध्ये ते ३४४१ असे नोंदविले आहे. मागील रिडिंग ३०२५ आहे.
प्रत्यक्षात चालू रिडिंग ३२४१ इतके असताना त्यापेक्षा २०० युनिट ज्यादा नोंदविण्यात आल्याने त्यांना ३ हजार ६४० इतके वीज बिल आले आहे. यामध्ये चुकीच्या नोंदीमुळे तब्बल १ हजार ६०० इतक्या
रकमेचे बिल ज्यादा आणि बेकायदा आले आहे. ही बाब लक्षात आल्यानंतर कुलकर्णी यांना धक्काच बसला. त्यांनी तत्काळ वीज वितरणच्या कार्यालयात धाव घेतली.
वीज कार्यालयात अधिकारी, कर्मचारी आपली चूक कबूल करायलाही तयार नव्हते. त्यांनी बिलाच्या झेरॉक्स व इतर बाबींसाठी कुलकर्णी यांनाच धावाधाव करायला लावली. या प्रकारामुळे ग्राहकांतून नाराजी व्यक्त होत आहे. दरम्यान, कºहाडातील वीज ग्राहकांना एलईडी बल्बचा ज्यादा आकार
आला, फलटण तालुक्यातील शेतकºयाला वापर नसताना विजेचे भरमसाट वीज बिल आले, रोजच असे प्रकार उघडकीस येताना दिसत आहेत.
चूक वीज कंपनीची...पळापळ ग्राहकांची
महावितरण कंपनीने केलेली चूक निस्तरण्यासाठी संबंधित ग्राहकांनाच हेलपाटे घालावे लागत आहेत. यात आर्थिक झळ तर बसतेच उलट मनस्तापही सोसावा लागत आहे.
वीजबिल आॅनलाईन पद्धतीने आम्ही भरत होतो, अशा पद्धतीने ज्यादा आकारणीचे बिल दिले गेले असले तरी तेव्हा ते समजणे अवघड होते. काही दिवसांपूर्वी ही पद्धत बंद केली, त्यामुळे आता कुठे आमची होणारी लूट समोर आली.
- चिन्मय कुलकर्णी, वीज ग्राहक