महाबळेश्वरात अवतरला स्वर्ग

By Admin | Published: April 1, 2017 12:05 PM2017-04-01T12:05:04+5:302017-04-01T12:05:04+5:30

पहाटे धुकं तर दुपारी कडक ऊन : गार वाऱ्यामुळे पर्यटकही सुखावले

Paradise in Mahabaleshwar | महाबळेश्वरात अवतरला स्वर्ग

महाबळेश्वरात अवतरला स्वर्ग

googlenewsNext

आॅनलाईन लोकमत
महाबळेश्वर, दि. १ : संपूर्ण महाराष्ट्र कडक उन्हामुळे तापलेला असताना महाबळेश्वरमध्ये निसगार्चा अनोखा नजराणा अनुभवास मिळत आहे. महाबळेश्वरच्या वेण्णा लेक परिसरात गुरुवारी धुक्याची चादर पसरली होती. तर दुपारी कडक ऊन पडले होते. मात्र, या कडक उन्हातही घनदाट जंगलातील झाडांमुळे वाहणारे गार वारे मनाला मोहून टाकत होते.


नौकाविहारासाठी प्रसिद्ध असलेल्या वेण्णा लेक वर धुक्याचे साम्राज्य पसरले होते. त्यानंतर उन्हाचा पारा चांगलाच तापला होता. थंड हवेचे ठिकाण महाबळेश्वर असूनही चांगलाच उकाडा जाणवत होता. त्यामुळे बाजारपेठेत तुरळ गर्दी दिसत होती. बाजारपेठेतही पंख्यांचा वापर केला जात होता. दुपारनंतर वातावरणात बदल होऊ लागला. उखाडा कमी होऊ लागली

सायंकाळी चारनंतर पुन्हा ढगाळ वातावरण निर्माण झाले. सहाच्या सुमार बाजारपेठ व परिसरामध्ये सगळीकडे धुके पसरले.
धुके पसरल्यावर काही पर्यटक धुक्याचे फोटो घेण्यात मग्न होते. परंतु चांगला फोटो मिळतच नव्हते. पर्यटकाच्या चेहऱ्यावर निराशा दिसून येत होती. वातावरणात अचानक होत असलेल्या बदलामुळे पर्यटक आनंद व्यक्त करत होते. सायंकाळी थंड वातावरणात पर्यटकाची बाजारपेठमध्ये चांगली गर्दी दिसून येत होती. (प्रतिनिधी)


वेण्णा लेकवर धुक्याचे साम्राज्य
नौकाविहारासाठी प्रसिद्ध असलेल्या वेण्णा लेक वर धुक्याचे साम्राज्य व सकाळी उन्हाच्या झळा तर दुपारनंतर महाबळेश्वर मध्ये सर्वत्र धुके पसरल्याचे दृश्य होते.

Web Title: Paradise in Mahabaleshwar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.