मंत्र्यांना राजकीय शिक्षा देणार; भारत पाटणकर यांचा इशारा

By Admin | Published: May 15, 2014 11:25 PM2014-05-15T23:25:29+5:302014-05-15T23:25:29+5:30

कोयनानगर : कोयना धरणग्रस्तांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत दोन वर्षांपासून खोटी आश्वासने देणारे उपमुख्यमंत्री अजित पवार, पुनर्वसनमंत्री पतंगराव कदम,

Provide political education to ministers; Indication of Bharat Patankar | मंत्र्यांना राजकीय शिक्षा देणार; भारत पाटणकर यांचा इशारा

मंत्र्यांना राजकीय शिक्षा देणार; भारत पाटणकर यांचा इशारा

googlenewsNext

कोयनानगर : कोयना धरणग्रस्तांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत दोन वर्षांपासून खोटी आश्वासने देणारे उपमुख्यमंत्री अजित पवार, पुनर्वसनमंत्री पतंगराव कदम, जलसंपदामंत्री सुनील तटकरे, पालकमंत्री शशिकांत श्ािंदे हे कोयना धरणग्रस्तांचे शत्रू आहेत. दरवर्षी तेच आश्वासन देणार्‍या आघाडी शासनाने कोयना पुनर्वसनासाठी येत्या २६ जूपपर्यंत भरघोस निधी दिला नाही तर चार तालुक्यात विखुरलेले धरणग्रस्त अंदोलन करुन या चार मंत्र्यांना राजकीय शिक्षा देतील, असा इशारा श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनी दिला. कोयनानगर येथे प्रकल्पग्रस्तांच्या मेळाव्यास मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी हरीष दळवी, संजय लाड, चैतन्य दळवी, विठ्ठल कदम, सुदाम थोरवडे, किशोर देशमुख, अशोक साळुंखे, सुभाष देशमुख उपस्थित होते. डॉ. पाटणकर म्हणाले, दि. १ आॅगस्ट २०१२ रोजी महाबळेश्वरला पुर्नवसनमंत्री पतंगराव कदम यांनी घेतलेल्या बैठकीत एका वर्षात शंभर टक्के विकसनशिल पुर्नवसन करण्याचे आश्वासन दिले होते. यासाठी एक समिती गठीत करण्याचे नाटक केले. वर्षभरापासून पुनर्वसनाचे काम ठप्प आहे. कोयना धरणग्रस्तांना पर्यायी जमिन दिल्या नाहीत. दोन वर्षे तेच अश्वासान दिले जाते आहेत. येत्या २६ जूनपर्यंत कोयना पुर्नवसनासाठी भरीव निधी आला नाही, तर चार तालुक्यातील धरणग्रस्त अंदोलन करणार आहेत. (वार्ताहर)

Web Title: Provide political education to ministers; Indication of Bharat Patankar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.