कोयना भागात पावसाचा जोर ओसरला, अवघा नऊ मिलीमीटर पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2018 15:42 IST2018-08-29T15:40:20+5:302018-08-29T15:42:09+5:30
सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागातील धरण क्षेत्रात पावसाचा जोर पूर्ण ओसरला असून, कोयना परिसरात २४ तासांत अवघा नऊ मिलीमीटर पाऊस झाला आहे. तर धरणातून १५३६४ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू असून, दरवाजे दीड फुटावर स्थिर आहेत.

कोयना भागात पावसाचा जोर ओसरला, अवघा नऊ मिलीमीटर पाऊस
सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागातील धरण क्षेत्रात पावसाचा जोर पूर्ण ओसरला असून, कोयना परिसरात २४ तासांत अवघा नऊ मिलीमीटर पाऊस झाला आहे. तर धरणातून १५३६४ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू असून, दरवाजे दीड फुटावर स्थिर आहेत.
जिल्ह्याच्या पश्चिम भागात सतत पाऊस होत आहे. या पावसाचा जोर कमी-जास्त होत आहे. तीन दिवसांपासून पावसाचा जोर एकदम कमी झाला आहे. त्यामुळे धरणात पाण्याची आवक कमी होत आहे.
बुधवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयना धरण परिसरात अवघा नऊ मिलीमीटर पाऊस झाला असून, आतापर्यंत एकूण ५१२७ मिलीमीटर पाऊस झाला आहे.
कोयना १०२.७७ टीएमसी पाणीसाठा असून, धरणात २७५३१ क्युसेक पाण्याची आवक होत आहे. धरणाचे सहा दरवाजे दीड फुटावर असून, त्यातून १३२६४ तर पायथा वीजगृहातून २१०० असे मिळून १५३६४ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
जिल्ह्यातील धोम, उरमोडी, तारळी, कण्हेर, बलकवडी ही धरणेही भरली असून, पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नदीच्या पाणीपातळीत वाढ होत आहे.