मोदक अन् शिरखुर्मा वाटपातून सलोखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2017 11:37 PM2017-09-04T23:37:00+5:302017-09-04T23:37:00+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
कºहाड : मोदक अन् शिरखुर्मा वाटपातून कºहाडात गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येला सलोख्याचे वातावरण पाहायला मिळाले. या उपक्रमात शहरातील मुस्लीम बांधवांसह नागरिकही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
गणेशोत्सव, बकरी ईद व जैन समाजाच्या पर्यूषन पर्वानिमित्त मोदक अन् शिरखुर्मा वाटपाचा कार्यक्रम सोमवारी सायंकाळी प्रीतिसंगमावर पार पडला. यावेळी माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण, नगराध्यक्षा रोहिणी शिंंदे, जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील, पोलिस उपअधीक्षक नवनाथ ढवळे उपस्थित होते.
‘शहारातील बंधुत्व टिकून राहिल्यास शहराच्या चौफेर विकासास नक्कीच हातभार लागतो. ते उपक्रम टिकून राहावेत, यासाठी कºहाडात मुस्लीम बांधवांकडून मोदक, शिरखुरमा वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला. या उपक्रमामुळे शहराच्या एकीत भर पडणार आहे. असे उपक्रम अत्यंत स्तुत्य आहेत’, असे मत माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केले.
पोलिस अधीक्षक पाटील म्हणाले, ‘येथे सामाजिक सलोख्याचे वातावरण फार चांगले आहे. किरकोळ गोष्टींवरून समाज व गावाला लागलेला डाग पुसून काढायला किमान दोन पिढ्या खर्ची पडतात. त्यामुळे नको त्या गोष्टीत अडकून न राहता प्रगतीचा विचार करून सलोख्याचे संबध वाढले पाहिजेत. यासाठी प्रयत्न होण्याची गरज आहे.’
यावेळी नगरसेवक सौरभ पाटील, ज्येष्ठ नगरसेवक विनायक पावसकर, माजी नगराध्यक्ष अल्ताफ शिकलगार यांची भाषणे झाली. माजी उपनगराध्यक्ष फारूक पटेवकर यांनी प्रास्ताविक करून आभार मानले.