साहित्यातील समीक्षा सिद्धांत आश्रित बनलाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2017 11:00 PM2017-11-29T23:00:31+5:302017-11-29T23:00:31+5:30

Review theory based on literature became dependent | साहित्यातील समीक्षा सिद्धांत आश्रित बनलाय

साहित्यातील समीक्षा सिद्धांत आश्रित बनलाय

Next


सातारा (कवीवर्य वि. दा. करंदीकर नगरी) : ‘साहित्याची समीक्षा सिद्धांत हा तसा चिंतनाचा विषय आहे. समीक्षेचा सिद्धांत अलीकडे प्रकाशक आश्रित आणि लेखकाची समीक्षा पद्धत हेही आश्रित झाली आहे. समीक्षा सिद्धांतमध्ये जात नावाचे स्थान काय? हा संशोधनाचा विषय आहे. समीक्षा व्यवहार पहिल्यापासून समाधानकारक नव्हता आणि आजही तो नाही. त्यामुळे या दोन्हींमध्ये सुधारणा करण्याची गरज आहे,’ असे मत अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. नागनाथ कोतापल्ले यांनी व्यक्त केले.
महाराष्टÑ साहित्य परिषद शाहूपुरी शाखा आणि रयत शिक्षण संस्थेचे छत्रपती शिवाजी कॉलेजचा मराठी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय विभागीय समीक्षा साहित्य संमेलनाचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते.
यावेळी रा.भा. पाटणकर व्यासपीठावर संमेलनाध्यक्ष डॉ. हरिश्चंद्र थोरात, स्वागताध्यक्ष उद्योजक संतोष यादव, रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉ. अनिल पाटील, मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, रयतचे सचिव डॉ. भाऊसाहेब कराळे, किशोर बेडकिहाळ, मसाप जिल्हा प्रतिनिधी विनोद कुलकर्णी, रवींद्र बेडकिहाळ, सोपानकाका चव्हाण, प्रा.आर. एस. काळे, डॉ. अनिसा मुजावर आणि मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना संमेलनाध्यक्ष डॉ. हरिश्चंद्र थोरात म्हणाले, ‘स्वातंत्र्योत्तर कालखंडात आपल्या शिक्षणव्यवस्थेचे काय झाले आहे? हे आपण पाहतो आहोतच. तिच्यातील उदारमतवादी दृष्टिकोनामुळे तत्वज्ञानासह मानव शास्त्रांचे अस्तित्व कसेबसे तग धरून होते. जागतिकीकरण, बाजार, शिक्षणाचे खासगीकरण, कौशल्याधिष्ठित प्रशिक्षणांना आलेले महत्त्व या सर्व घटकांना दिलेल्या महत्त्वामुळे समीक्षेला, चिकित्सा करण्याला, विचार करण्याला पोषक असे वातावरण निर्माण करण्याची जबाबदारी शिक्षणक्षेत्राने पूर्णपणे झटकून टाकली आहे.’
संमेलनासाठी कोषाध्यक्ष सुनीताराजे पवार, सहनिमंत्रक राजन लाखे, वि. दा. पिंंगळे, प्रा. तानसेन जगताप, शिरीष चिटणीस, पुरुषोत्तम काळे, दिनकर झिंब्रे, रावसाहेब पवार, मसाप पुणेचे पदाधिकारी, विविध जिल्ह्यातून आलेले प्रतिनिधी, शिवाजी कॉलेज मराठी विभाागाचे विद्यार्थी, विद्यार्थिनी, प्राध्यापक, साताºयातील साहित्यप्रेमी, वाचक नागरिक मोठ्या संख्येने संमेलनास उपस्थित होते.
संमेलन यशस्वी होण्यासाठी मसाप शाहूपुरी शाखेचे कार्यकारिणी कार्याध्यक्ष नंदकुमार सावंत, कार्यवाहक अ‍ॅड. चंद्रकांत बेबले, कार्यवाहक डॉ. उमेश करंबळेकर, कोषाध्यक्ष राजेश जोशी, प्रवीण पाटील, सुभाषचंद्र सरदेशमुख, संजय माने, अमर बेंद्रे, दीपाली धुमाळ, फातिमा नदाफ, स्थानिक संयोजन समितीचे समन्वयक प्रा. गजानन चव्हाण, मराठी विभागप्रमुख डॉ. शिवलिंग मेनकुदळे, डॉ. कांचन नलवडे, सहसंयोजक डॉ. मानसी लाटकर, डॉ. संजयकुमार सरगडे, प्राचार्य सीताराम गोसावी यांनी परिश्रम घेतले.
स्रेहल दामले यांनी सूत्रसंचालन केले तर शिवाजी कॉलेजचे मराठी विभागप्रमुख डॉ. शिवलिंग मेनकुदळे यांनी आभार मानले.
मराठीला अभिजात दर्जासाठी लढा
‘मसाप शाहूपुरी शाखेने गेल्या सहा वर्षांत वेगवेगळे उपक्रम राबवले असून, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, यासाठी प्रा. मिलिंद जोशी आणि रवींद्र बेडकिहाळ यांच्या मार्गदर्शनाखाली लढा उभा केला,’ अशी माहिती संमेलनाचे निमंत्रक विनोद कुलकर्णी यांनी दिली.

Web Title: Review theory based on literature became dependent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.