संस्कार शिबिरे ही भावी पिढीसाठी देणगी : सातारकर बाबा महानुभाव
By admin | Published: May 31, 2015 10:15 PM2015-05-31T22:15:30+5:302015-06-01T00:15:19+5:30
येथून बालकांना मिळणारी संस्काराची शिदोरी आयुष्याच्या नव्या वळणावर नेणारी ठरणार
सातारा : आजची शिक्षणप्रणाली कितीही गतीमान असली तरी भयमुक्त जीवनासाठी संस्कार गरजेचे आहेत. महानुभाव आश्रमातील संस्कार शिबीर हे भावी पिढीसाठी देणगी असून प्रत्येक विद्यार्थी संस्कारहीन नको तर संस्कारक्षम असावा याची पालकांनी काळजी घ्यावी, असे प्रतिपादन सातारा जिल्हा महानुभाव परिषदेचे अध्यक्ष व आश्रमाचे संचालक आचार्य प्रवर महंत सातारकर बाबा महानुभाव यांनी केले.शतकपूर्ती संस्था असलेल्या करंजे, ता. सातारा येथील महानुभाव आश्रमात संस्कार शिबिर समारोपीय धर्मसभा, बक्षिस वितरण समारंभ व कै. उपाध्यकुलाचार्य उद्धवराज बिडकर बाबा पुरस्कार प्रदान सोहळ्याप्रसंगी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.यावेळी जि. प. चे उपाध्यक्ष रवी साळुंखे, पं. स. सदस्य संजय पाटील, नगरसेविका सुवर्णा पाटील, नगरसेवक तुषार पाटील, महालक्ष्मी पतसंस्थेचे संस्थापक शिरीष चिटणीस, बांधकाम व्यावसायिक श्रीधर कंग्राळकर, शाहूपुरीच्या सरपंच रेश्माताई गिरी, उपसरपंच शंकर किर्दत, सुधाकर यादव, सुरेश शेडगे, राहुल यादव लाहोटी, आप्पा गोसावी, डॉ. कन्हैय्या कुंदप यांची प्रमुख उपस्थिती होती.जि. प. चे उपाध्यक्ष रवी साळुंखे म्हणाले, महानुभाव आश्रमाने आयोजित केलेले संस्कार शिबीर प्रेरणादायी असून येथून बालकांना मिळणारी संस्काराची शिदोरी आयुष्याच्या नव्या वळणावर नेणारी ठरणार आहे. (प्रतिनिधी)