सातारा : देवदर्शनाहून पंढरपूरवरून परतणाऱ्या भक्तांच्या गाडीला अपघात; सहा जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2018 12:50 PM2018-07-23T12:50:12+5:302018-07-23T13:02:23+5:30

आषाढी एकादशीनिमित्ताने पंढरपूर येथे विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेऊन गावी परतत असलेल्या भक्तांच्या गाडीला सातारा तालुक्यातील शिवथर हद्दीत अपघात झाला. त्यांच्या कारला ट्रकने धडक दिली. यामध्ये चालकासह सहाजण जखमी झाले आहेत.

Satara: Accidents in the devotees' train returning from Pandharpur to Devdarshan; Six injured | सातारा : देवदर्शनाहून पंढरपूरवरून परतणाऱ्या भक्तांच्या गाडीला अपघात; सहा जखमी

सातारा : देवदर्शनाहून पंढरपूरवरून परतणाऱ्या भक्तांच्या गाडीला अपघात; सहा जखमी

googlenewsNext
ठळक मुद्देदेवदर्शनाहून पंढरपूरवरून परतणाऱ्या भक्तांच्या गाडीला अपघात; सहा जखमीकारला ट्रकची धडक; सर्वजण रत्नागिरी जिल्ह्यातील

सातारा : आषाढी एकादशीनिमित्ताने पंढरपूर येथे विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेऊन गावी परतत असलेल्या भक्तांच्या गाडीला सातारा तालुक्यातील शिवथर हद्दीत अपघात झाला. त्यांच्या कारला ट्रकने धडक दिली. यामध्ये चालकासह सहाजण जखमी झाले आहेत. सर्व जखमी चिंचवली, ता. खेड, जि. रत्नागिरी येथील आहेत.

चालक लहू गोपाळ सूर्वे (वय ४५, रा. करोली, ता. खेड), रामचंद्र नारायण हंबीर (५२), जनार्धन जिजाबा पवार (४०), रामचंद्र गोविंद रसाळ (६५), वसंत बाळू कांदेकर (६५), सहदेव परशुराम पवार (८०) अशी जखमींची नावे आहेत.

याबाबत माहिती अशी की, रत्नागिरी जिल्ह्यातील चिंचवली येथील सातजण रविवारी रात्री आषाढीनिमित्ताने पंढरपूरला गेले होते. सोमवारी सकाळी सात वाजता देवदर्शन करून पुन्हा गावी परत होते. त्यांची कार (एमएच ०८ झेड ५७५४) ही सकाळी अकरा वाजता सातारा तालुक्यातील शिवथर हद्दीत आली. त्याचवेळी समोरून येत असलेला ट्रक (एमएच १२ केपी ६२१७)ने जोरदार धडक दिली. यामध्ये चालकासह सहाजण जखमी झाले.

पोलीस व्हॅनमधून रुग्णालयात

अपघाताची माहिती मिळताच सातारा तालुका पोलीस ठाण्यातील कर्मचारी तातडीने घटनास्थळी धावून गेले. त्यांनी पोलीस व्हॅनमधून सर्व जखमींना साताऱ्यातील क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले.

Web Title: Satara: Accidents in the devotees' train returning from Pandharpur to Devdarshan; Six injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.