सातारा : सहलीला आलेल्या विद्यार्थ्याचा डोक्यात फांदी पडून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2019 02:54 PM2019-01-04T14:54:45+5:302019-01-04T14:55:46+5:30
जावळी तालुक्यातील प्रसिद्ध अशा ऐतिहासिक वडाचे म्हसवे गावात प्राचीन वड पाहण्यासाठी फलटण तालुक्यातील अलगुडेवाडी येथील कमला निमकर बालभवन या शाळेची सहल शुक्रवारी सकाळी आली होती. यावेळी प्रज्वल नितीन गायकवाड (वय ११) पाचवीमध्ये शिकत असलेला विद्यार्थी वडाच्या पारंब्याशी खेळत असताना त्याच्या डोक्यात वडाच्या झाडाची पारंबी पडली. त्यातच त्याचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.
सायगाव (सातारा) : जावळी तालुक्यातील प्रसिद्ध अशा ऐतिहासिक वडाचे म्हसवे गावात प्राचीन वड पाहण्यासाठी फलटण तालुक्यातील अलगुडेवाडी येथील कमला निमकर बालभवन या शाळेची सहल शुक्रवारी सकाळी आली होती. यावेळी प्रज्वल नितीन गायकवाड (वय ११) पाचवीमध्ये शिकत असलेला विद्यार्थी वडाच्या पारंब्याशी खेळत असताना त्याच्या डोक्यात वडाच्या झाडाची पारंबी पडली. त्यातच त्याचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.
जावळी तालुक्यातील प्रसिद्ध असलेल्या वडाचे म्हसवे या गावामध्ये शालेय सहली दरवर्षी येत असतात. फलटण तालुक्यातील कमला निमकर शाळेतील चार शिक्षक तीस विद्यार्थ्यांची सहल शुक्रवारी म्हसवे गावात आली होती. सहलीतील मुलेही वडाच्या पारंब्यांबरोबर खेळत असतानाच प्रज्वलच्या डोक्यात जोरात फांदी पडली.
फांदी पडताच इतर मुलांनी आरडाओरडा सुरू केला. यावेळी शिक्षकांनी त्याला तत्काळ कुडाळ प्राथमिक आरोग्य केंद्र्रात उपचारासाठी दाखल केले. मात्र येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासल्यानंतर त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले.
येथील वड हे वनविभागाच्या अखत्यारित येत असून, मोठ्या प्रमाणात सहली येत असतानाही याठिकाणी वनविभागाचा एकही कर्मचारी नसतो. त्यामुळे येथील सुरक्षेस व घडलेल्या घटनेस वनविभागच जबाबदार असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे.