सातारा : कोयना धरण झपाट्याने भरू लागले, ९२ टीएमसी साठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2018 01:29 PM2018-08-06T13:29:24+5:302018-08-06T13:33:05+5:30
सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर कमी झाला असलातरी आवक होत असल्याने कोयना धरण झपाट्याने भरू लागले आहे. सध्या धरणात ९१.७४ टीएमसी पाणीसाठा असून, पायथा वीजगृहातून १०५० क्युसेक विसर्ग सुरू आहे.
सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर कमी झाला असलातरी आवक होत असल्याने कोयना धरण झपाट्याने भरू लागले आहे. सध्या धरणात ९१.७४ टीएमसी पाणीसाठा असून, पायथा वीजगृहातून १०५० क्युसेक विसर्ग सुरू आहे.
जिल्ह्याच्या पश्चिम भागात सतत २५ दिवस पाऊस पडत होता. यामुळे प्रमुख धरणे भरण्याच्या मार्गावर आहेत. सध्या पावसाचा जोर कमी झाला असलातरी धरणात पाण्याची आवक होत आहे. त्यामुळे कोयना धरणात गेल्या तीन दिवसांत चार टीएमसीने वाढ झाली आहे.
सोमवारी सकाळी आठपर्यंत कोयना धरणात ९१.७४ टीएमसी इतका पाणीसाठा झाला होता. तर ११ मिलीमीटर पाऊस झाला. सध्या धरणात १८५८८ क्युसेक पाण्याची आवक होत असून, पायथा वीजगृहातून पाणी सोडण्यात येत आहे.
सोमवारी सकाळपर्यंत धोम धरणात ११.६२ टीएमसी पाणीसाठा होता. तर कण्हेरमध्ये ५.८२, बलकवडी ३.४६ तर तारळी धरणात ४.९७ टीएमसी साठा होता. तारळी धरणातून १४७९ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
धरणक्षेत्रातील २४ तासांतील व एकूण पाऊस मिलीमीटरमध्ये
धोम ०० (४८८)
कोयना ११ (३७८७)
बलकवडी ०२ (१८९८)
कण्हेर ०० (५८२)
उरमोडी ०९ (९०२)
तारळी ०४ (१६६४)