सातारा : कमी झालेली थंडी पुन्हा वाढली, पहाटेच्या सुमारास गारठा : साताऱ्यातील किमान तापमान ११ अंशापर्यंत; कमाल ३० च्यावरतीच स्थिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2018 03:15 PM2018-01-23T15:15:06+5:302018-01-23T15:19:09+5:30
गतवर्षीपेक्षा यंदा थंडीत वाढ झाली असलीतरी गेल्या काही दिवसांत उतार आला होता. मात्र, आता सहा दिवसांपासून थंडी पुन्हा वाढली आहे. सध्या साताऱ्यांतील किमान तापमान ११ अंशाच्या दरम्यान असून, कमाल तापमान मात्र अजूनही ३० च्यावरतीच स्थिर आहे. सध्या पहाटे व सकाळच्या सुमारास गारठा जाणवत आहे.
सातारा : गतवर्षीपेक्षा यंदा थंडीत वाढ झाली असलीतरी गेल्या काही दिवसांत उतार आला होता. मात्र, आता सहा दिवसांपासून थंडी पुन्हा वाढली आहे. सध्या साताऱ्यांतील किमान तापमान ११ अंशाच्या दरम्यान असून, कमाल तापमान मात्र अजूनही ३० च्यावरतीच स्थिर आहे. सध्या पहाटे व सकाळच्या सुमारास गारठा जाणवत आहे.
गेल्यावर्षी नोव्हेंबरपासून थंडीस सुरुवात झाली. २९ डिसेंबर रोजी दोन वर्षांतील सर्वात कमी म्हणजे ९.०४ अंश तापमानाची नोंद साताऱ्यात झाली होती. तर डिसेंबर अखेर व जानेवारी महिन्याच्या पहिल्या काही दिवसांत साताऱ्यांतील किमान तापमान सरासरी ११ ते १३ अंशाच्या दरम्यान स्थिर होते. तर दुसरीकडे दुपारच्या सुमारास ऊन वाढत असल्याने उन्हाळ्याची चाहूलही जाणवत होती. मात्र, मकरसंक्रांतीपासून थंडीचे प्रमाण कमी झाले.
किमान तापमान वाढून १६ ते १९ अंशाच्या दरम्यान स्थिर होते. तर कमाल तापमानाने ३० अंशाचा टप्पा पार केला होता. असे असतानाच आता सहा दिवसांपासून थंडी पुन्हा वाढली आहे. किमान तापमान ११ अंशापर्यंत खाली आले आहे. दि. २१ रोजी किमान तापमान ११.०५ , दि. २२ रोजी ११.०४ होते. तर २३ रोजी १२.०७ अंश होते. तर कमाल तापमान ३० अंशाच्या वर आहे. दि. २१ रोजी ३०.०७, २२ रोजी ३०.०४ होते.
- दि. १६ जानेवारी १८.०६ ३२.००
- दि. १७ जानेवारी १६.०२ ३२.०५
- दि १८ जानेवारी १४.०७ ३०.०६
- दि. १९ जानेवारी १३.०५ ३१.०१
- दि. २० जानेवारी १२.०२ ३०.०८
- दि. २१ जानेवारी ११.०५ ३०.०७
- दि. २२ जानेवारी ११.०४ ३०.०४
- दि. २३ जानेवारी १२.०७ ...