सातारा जिल्ह्यात ३३६ मिलीमीटर पाऊस, धरणक्षेत्रात जोरदार हजेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2018 04:19 PM2018-07-10T16:19:06+5:302018-07-10T16:23:50+5:30
साताऱ्यांसह जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर वाढल्यामुळे धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत आहे. त्यामुळे मंगळवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयना धरणात जवळपास तीन टीएमसीने वाढ झाली. सध्या साठा ४६.६२ टीएमसीवर गेला आहे. तर जिल्ह्यात २४ तासांत ३३६ मिलीमीटर पाऊस झाला आहे.
सातारा : साताऱ्यांसह जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर वाढल्यामुळे धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत आहे. त्यामुळे मंगळवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयना धरणात जवळपास तीन टीएमसीने वाढ झाली. सध्या साठा ४६.६२ टीएमसीवर गेला आहे. तर जिल्ह्यात २४ तासांत ३३६ मिलीमीटर पाऊस झाला आहे.
गेल्या आठ दिवसांपासून जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊस कोसळत आहे. या पावसाचा जोर कायम असल्याने ओढे, नाले खळाळू लागले आहेत. तर भात लागणीच्या कामाला वेग आला आहे. सतत पाऊस होत असल्याने पेरणीची कामेही खोळंबली आहेत. त्यातच सोमवारी रात्रीपासून पावसाने पुन्हा जोरदार हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे.
मंगळवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयना धरण परिसरात ९५, नवजा ९६ व महाबळेश्वर येथे ९४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. हा पाऊस सरासरी ९५ मिलीमीटर इतका आहे.
मंगळवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत धोम धरणात २०५३ क्युसेक पाण्याची आवक झाली असून, साठा ४.८२ टीएमसीवर पोहोचला आहे. कण्हेरमध्ये ३.९० टीएमसी साठा आहे. कोयना धरणात २७ हजार ३८३ क्युसेक पाण्याची आवक झाली आहे. बलकवडी, उरमोडी तसेच तारळी धरणातही पाण्याची आवक होत असून, हळूहळू धरणात साठा वाढू लागला आहे.
सरासरी १५.८ मिलीमीटर पाऊस...
जिल्ह्यात मंगळवारी पहाटे आणि सोमवारी दिवसभरात एकूण ३३६.७ मिलीमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. जिल्ह्यात गेल्या २४ तासांत एकूण सरासरी १५.८ मिलीमीटर पाऊस झाला आहे.
जिल्ह्यात मंगळवारी सकाळी आठ वाजेपर्यंत झालेल्या पावसाची तालुकानिहाय माहिती आणि कंसात आतापर्यंत झालेल्या एकूण पावसाची आकडेवारी मिलीमीटरमध्ये पुढीलप्रमाणे आहे.
सातारा- ५.९ (३०१.३), जावळी - १८.८ (४५६), पाटण - २०.५ (४४१.५), कऱ्हाड- २.५ (२१३.५), कोरेगाव २ (१५६.३), खटाव - १.२ (१८१.६), माण - ०.१ (८८.७), फलटण- १.७ (९३.३), खंडाळा- ९.१ (१५२.६), वाई- ११.७ (२५०.१) आणि महाबळेश्वर-१००.७ (१३६८.७) याप्रमाणे आजपर्यंत एकूण ३७०३.६ तर सरासरी ३३६.७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.
धरणक्षेत्रातील २४ तासांतील व एकूण पाऊस मिलीमीटरमध्ये
धोम २२ (३२०)
कोयना ९५ (१७७६)
बलकवडी ४९ (८२५)
कण्हेर ११(२८५)
उरमोडी ०७ (३५१)
तारळी ३५(५८२)