सातारा : खड्डे भरण्याची डेडलाईन संपली तरी रस्त्यांवर खड्ड्यांची मालिका, कंबरडे मोकळे करण्यासाठी रस्त्यांवर उपचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2017 02:46 PM2017-12-21T14:46:25+5:302017-12-21T14:52:50+5:30

ज्याचे कंबरडे अवघडले आहे, मान दुखत आहे, अशा व्याधीग्रस्तांनी सातारा शहरातील रस्त्यांवर वेगाने वाहन चालवायला हरकत नाही. हो मात्र ज्यांना उपचाराची गरज आहे, त्यांनी मात्र डॉक्टरांना दाखवावे, असा फलक खड्डेयुक्त रस्त्यांवर लावायला हरकत नाही.

Satara: Even if deadline to fill potholes, potholes on the roads, roads to be opened | सातारा : खड्डे भरण्याची डेडलाईन संपली तरी रस्त्यांवर खड्ड्यांची मालिका, कंबरडे मोकळे करण्यासाठी रस्त्यांवर उपचार

सातारा : खड्डे भरण्याची डेडलाईन संपली तरी रस्त्यांवर खड्ड्यांची मालिका, कंबरडे मोकळे करण्यासाठी रस्त्यांवर उपचार

Next
ठळक मुद्देकंबरडे मोकळे करण्यासाठी रस्त्यांवर उपचारजखम रेड्याला आणि मलम पखालिला, सातारा पालिकेचा कारभारपर्यटकांमध्ये सेलिब्रिटी करतात साताऱ्याच्या अवस्थेचा जगभर प्रचार

सातारा : ज्याचे कंबरडे अवघडले आहे, मान दुखत आहे, अशा व्याधीग्रस्तांनी सातारा शहरातील रस्त्यांवर वेगाने वाहन चालवायला हरकत नाही. हो मात्र ज्यांना उपचाराची गरज आहे, त्यांनी मात्र डॉक्टरांना दाखवावे, असा फलक खड्डेयुक्त रस्त्यांवर लावायला हरकत नाही. कंबरडे मोकळे करण्याचा उपचारच जणू या रस्त्यांवर वाहन चालवताना अनुभवायला मिळतो आहे.

तातडीची नड लक्षात घेऊन कुठलेही काम हाती घ्यायचे असते; परंतु सातारा पालिकेचा सध्या  जखम रेड्याला आणि मलम पखालिला, या म्हणीनुसार कारभार सुरू आहे. शहरातील राधिका रस्ता तसा प्रचंड वाहतुकीचा आणि प्रशस्तही आहे. याच रस्त्यावर मोठी हॉटेल्स असल्याने साताऱ्यात येणारे पर्यटक याच रस्त्याने येतात.

रस्त्यावरील खड्डे साताऱ्याचे दारिद्र्य उघड करतात. इतर रस्ते तुलनेने चांगले असले तरी या रस्त्याची दुर्दशा पाहून जसे अंगण घराची अवकळा सांगते, त्याच पद्धतीने कामकाज सुरू आहे. या रस्त्यावरून प्रवास करताना पुन्हा साताऱ्यात यायलाच नको, असा ठाम निश्चय करूनच काहीजण निघून जातात.

पर्यटकांमध्ये मोठे सेलिब्रिटीही आहेत की जे साताऱ्याच्या अवस्थेचा प्रचार जगभर करत फिरतात. त्यामुळे अशा रस्त्यांवर पडलेले खड्डे पालिकेच्या कारभाराची लख्तरे वेशीला टांगत आहेत, याकडे पालिका केव्हा लक्ष देणार आहे, असा प्रश्न विचारला जात आहे.

रस्त्यांवर पॅचवर्क होत नसल्याने खड्ड्यांचे आकार वाढत चालले आहेत, याच रस्त्यावर पालिकेचे उपनगराध्यक्ष राजू भोसले यांचेही हॉटेल आहे. ते तरी अजून शांत का आहेत? तातडीची नड म्हणून या रस्त्यावर केव्हाच डांबर पडायला हवे होते. तसे झाले नसल्याने उपनगराध्यक्षांचेही सत्तेत असून वजन राहिले नाही, असा अर्थ सातारकर काढत आहेत.




शहरातील रस्त्यांचे खड्डे मुजविण्याचे काम पालिकेने हाती घेतले आहे. आगामी काही दिवसांत हे रस्ते खड्डेमुक्त होतील. पॅचवर्क करण्याचे काम शहरातील काही रस्त्यांवर सुरू आहे.
- माधवी कदम,
नगराध्यक्षा

Web Title: Satara: Even if deadline to fill potholes, potholes on the roads, roads to be opened

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.