सातारा : ग्रंथमहोत्सवानिमित्ताने साताऱ्यांतून ग्रंथदिंडी, विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभाग, चार दिवस भरगच्च कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2018 12:04 PM2018-01-05T12:04:57+5:302018-01-05T12:08:21+5:30

सातारा जिल्हा ग्रंथमहोत्सव समिती आणि जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग यांच्या वतीने आयोजित ग्रंथमहोत्सवास शुक्रवार, दि. ५ रोजी प्रारंभ होत आहे. ५ ते ८ जानेवारी या कालावधीत चालणाऱ्या या ग्रंथमहोत्सवास ग्रंथदिंडीने सुरुवात करण्यात आली. यामध्ये शेकडो विद्यार्थी सहभागी झाले होते.

Satara: Grantham Hotswimitane's Glandthindi, Spontaneous Participation of Students, Four Days | सातारा : ग्रंथमहोत्सवानिमित्ताने साताऱ्यांतून ग्रंथदिंडी, विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभाग, चार दिवस भरगच्च कार्यक्रम

सातारा : ग्रंथमहोत्सवानिमित्ताने साताऱ्यांतून ग्रंथदिंडी, विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभाग, चार दिवस भरगच्च कार्यक्रम

Next
ठळक मुद्देसातारा : जिल्हा ग्रंथमहोत्सव समिती आणि जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग यांच्या वतीने आयोजित ५ ते ८ जानेवारी या कालावधीत ग्रंथमहोत्सव ग्रंथमहोत्सवास ग्रंथदिंडीने सुरुवात शाळांनी जनजागृती करणारे चित्ररथही सहभागी

सातारा : जिल्हा ग्रंथमहोत्सव समिती आणि जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग यांच्या वतीने आयोजित ग्रंथमहोत्सवास शुक्रवार, दि. ५ रोजी प्रारंभ होत आहे. ५ ते ८ जानेवारी या कालावधीत चालणाऱ्या या ग्रंथमहोत्सवास ग्रंथदिंडीने सुरुवात करण्यात आली. यामध्ये शेकडो विद्यार्थी सहभागी झाले होते.

सातारा जिल्हा परिषदेच्या मैदानावर भरलेल्या या ग्रंथमहोत्सवाच्या उद्घाटननिमित्ताने सकाळी साडेआठला ग्रंथदिंडी काढण्यात आली. राजवाडा येथील गांधीमैदानापासून ग्रंथदिंडीला प्रारंभ झाला. मोती चौक, राजपथ, पोवई नाका मार्गे ही दिंडी जिल्हा परिषदेच्या मैदानावर पोहोचली.

यामध्ये काही शाळांनी जनजागृती करणारे चित्ररथही सहभागी केले होते. यामध्ये महोत्सव समितीचे पदाधिकारी, साहित्यिकही सहभागी झाले होते. चार दिवस चालणाऱ्या या महोत्सव परिसंवाद, कवी संमेलन, कथाकथन यासह विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत.
 

Web Title: Satara: Grantham Hotswimitane's Glandthindi, Spontaneous Participation of Students, Four Days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.