सातारा : ध्वजारोहण व परेडसाठी पोलिस प्रशासन सज्ज, जिल्हा पोलिसांचा सराव व कवायती सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2018 02:49 PM2018-01-24T14:49:07+5:302018-01-24T15:02:44+5:30

प्रजासत्ताक दिनानिमित्त २६ जानेवारी रोजी शाहू क्रीडा संकुलात होणाऱ्या परेडसाठी जिल्हा परेड ग्राऊंडमध्ये सातारा जिल्हा पोलिसांचा सराव व कवायती सुरू आहे. तसेच कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून तयारी पूर्ण झाली आहे. प्रजासत्ताकदिनी सकाळी सव्वाआठ वाजता जिल्हा पोलिस मुख्यालय, जिल्हा न्यायालय व जिल्हाधिकारी कार्यलया आदी ठिकाणी एकाच वेळी ध्वजारोहण होणार आहे.

Satara: Prepare the police administration for the flag hoisting and parade, practice of district police and continuing drill | सातारा : ध्वजारोहण व परेडसाठी पोलिस प्रशासन सज्ज, जिल्हा पोलिसांचा सराव व कवायती सुरू

सातारा : ध्वजारोहण व परेडसाठी पोलिस प्रशासन सज्ज, जिल्हा पोलिसांचा सराव व कवायती सुरू

Next
ठळक मुद्देध्वजारोहण व परेडसाठी पोलिस प्रशासन सज्जजिल्हा पोलिसांचा सराव व कवायती सुरू

सातारा : प्रजासत्ताक दिनानिमित्त २६ जानेवारी रोजी शाहू क्रीडा संकुलात होणाऱ्या परेडसाठी जिल्हा परेड ग्राऊंडमध्ये सातारा जिल्हा पोलिसांचा सराव व कवायती सुरू आहे. तसेच कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून तयारी पूर्ण झाली आहे.

प्रजासत्ताकदिनी सकाळी सव्वाआठ वाजता जिल्हा पोलिस मुख्यालय, जिल्हा न्यायालय व जिल्हाधिकारी कार्यलया आदी ठिकाणी एकाच वेळी ध्वजारोहण होणार आहे. त्यानंतर साडेनऊ वाजता शाहू क्रीडा संकुलात पालकमंत्री विजय शिवतारे यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे. त्यानंतर परेड होणार आहे.

पोलिसांच्या परेडमध्ये एक परेड कमांडच्या नेतृत्वाखाली सेंकडरी कमांडर, पल्टन कमाटंर ५० कर्मचाऱ्यांची परेड होणार आहे. त्यानंतर होमगार्ड, एनसीसी, सैनिक स्कूल व आरएसएसच्या विद्यार्थ्यांची परेड होईल. ध्वजारोहणाच्या कार्यक्रमासह जिल्ह्यातील सर्व संवेदनशील ठिकाणी कडक बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. मंदीर, मस्जिद आणि गर्दीच्या कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

महाबळेश्वर या पर्यटनस्थळी मोठ्या प्रमाणात देश-विदेशातील पर्यटकांची वर्दळ असते. यावेळी वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी वाहतुकीत बदल करण्यात आले असून, लिंगमळा फाटा ते भेकवली फाटा एकेरी वाहतूक व भेकवली फाटा ते खालचा लिंगमळा नो एंट्री, विमल गार्डन ते महाबळेश्वर क्लबची एकेरी वाहतूक, क्षेत्र महाबळेश्वर नाका ते नाकिंदा बस स्टॉप एकेरी वाहतूक राहील.

Web Title: Satara: Prepare the police administration for the flag hoisting and parade, practice of district police and continuing drill

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.