सातारा : कोंडी टाळण्यासाठी बसस्थानकाचे प्रवेशद्वार पूर्ववत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2018 01:27 PM2018-04-23T13:27:36+5:302018-04-23T13:27:36+5:30

पोवई नाक्यावर सुरू असलेल्या ग्रेड सेपरेटरच्या कामामुळे एसटीच्या सातारा शहरातील मार्गात बदल केला. परंतु त्यामुळे बसस्थानक परिसरात वाहतुकीची कोंडी वारंवार होऊ लागली. ती टाळण्यासाठी एसटी महामंडळ, वाहतूक पोलीस अन् पालिकेच्या वतीने सकारात्मक पाऊल उचलले. रस्ता दुभाजक तोडून सोमवारी सकाळी प्रवेशद्वार आत व बाहेर जाणाऱ्याच्या गेटमध्ये बदल करण्यात आला.

Satara: To prevent deterioration, the bus station will be restored | सातारा : कोंडी टाळण्यासाठी बसस्थानकाचे प्रवेशद्वार पूर्ववत

सातारा : कोंडी टाळण्यासाठी बसस्थानकाचे प्रवेशद्वार पूर्ववत

Next
ठळक मुद्दे कोंडी टाळण्यासाठी बसस्थानकाचे प्रवेशद्वार पूर्ववतदुभाजकावर हातोडा : सातारा एसटी, वाहतूक शाखेचे सकारात्मक पाऊल

सातारा : पोवई नाक्यावर सुरू असलेल्या ग्रेड सेपरेटरच्या कामामुळे एसटीच्या सातारा शहरातील मार्गात बदल केला. परंतु त्यामुळे बसस्थानक परिसरात वाहतुकीची कोंडी वारंवार होऊ लागली. ती टाळण्यासाठी एसटी महामंडळ, वाहतूक पोलीस अन् पालिकेच्या वतीने सकारात्मक पाऊल उचलले. रस्ता दुभाजक तोडून सोमवारी सकाळी प्रवेशद्वार आत व बाहेर जाणाऱ्याच्या गेटमध्ये बदल करण्यात आला.

सातारा मध्यवर्ती बसस्थानकाचे प्रवेशद्वार कायमच वेगवेगळ्या कारणाने चर्चेत आले आहे. विभागीय कार्यालयाच्या शेजारी असलेल्या प्रवेशद्वारातून पूर्वी गाड्या आत जात होत्या. पण पोवईनाक्याकडून येणाऱ्या एसटी बसेस, खासगी वाहने मधूनच आत घुसत असल्याने वाहतुकीची कोंडी होत होती. त्यामुळे प्रवेशद्वारात बदल केला. नियोजित वस्तूसंग्रहालयाच्या इमारती शेजारी असलेले प्रवेशद्वार आत जाण्यासाठी वापरले जाऊ लागले.

पोवई नाक्यावर ग्रेड सेपरेटरचे काम सुरू झाल्यापासून एसटीच्या शहरातील मार्गात बदल केला. कोल्हापूर, कोरेगाव, रहिमतपूर दिशेने येणाऱ्या गाड्या वाढेफाटा मार्गे वळविण्यात आल्या. त्यामुळे या गाड्या पोवईनाक्याकडे न जाता बसस्थानकात येऊ लागल्या.

जाणाऱ्यां व आतून बाहेर येणाऱ्यां गाड्या एकमेकांना आडव्या येत असल्याने वाहतुकीची कोंडी होत होती. यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या असायच्या. यामुळे वाहनचालकांमधूनही नाराजी व्यक्त होत होती.

याची दखल घेऊन सोमवारपासून बदल करण्यात आला. पोवईनाक्याकडून येणारी सर्वच वाहने क्रीडा संकुलापर्यंत जाऊन तेथे वळसा घालून पुन्हा बसस्थानकापर्यंत यावे असे नियोजन केले आहे.

त्यासाठी खंडित दुभाजकात बॅरेकेट लावले आहे. तर बसस्थानकातून बाहेर येणाऱ्या गाड्या विभागीय कार्यालयाच्या शेजारील गेटमधून बाहेर येऊन मार्गस्थ होणार आहेत. त्यासाठी रस्त्या दुभाजक तोडला आहे. यामुळे वाहतुकीची कोंडी टाळण्यास मदत होणार आहे.

Web Title: Satara: To prevent deterioration, the bus station will be restored

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.