सातारा : मटका अड्ड्यावर छापा; दोघांवर गुन्हा, दोघांवर गुन्हा दाखल, रोख रक्कम-साहित्यही जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2017 05:48 PM2017-12-26T17:48:35+5:302017-12-26T17:51:18+5:30

मटका अड्ड्यावर पोलिसांचे छापा सत्र सुरूच असून, येथील खंडोबाचा माळ येथे सातारा शहर पोलिसांनी कारवाई करून दोघांवर गुन्हा दाखल केला. तसेच यावेळी रोख रक्कम व साहित्यही जप्त केले.

Satara: Printed at Matta Station; Crime against the couple, filing of a complaint against two, cash and materials were seized | सातारा : मटका अड्ड्यावर छापा; दोघांवर गुन्हा, दोघांवर गुन्हा दाखल, रोख रक्कम-साहित्यही जप्त

सातारा : मटका अड्ड्यावर छापा; दोघांवर गुन्हा, दोघांवर गुन्हा दाखल, रोख रक्कम-साहित्यही जप्त

Next
ठळक मुद्देखंडोबाच्या माळावरील गॅरेजच्या पाठीमागील मटका अड्ड्यावर छापा रोख रक्कम व साहित्य जप्त, मोहीम तीव्र

सातारा : मटका अड्ड्यावर पोलिसांचे छापा सत्र सुरूच असून, येथील खंडोबाचा माळ येथे सातारा शहर पोलिसांनी कारवाई करून दोघांवर गुन्हा दाखल केला. तसेच यावेळी रोख रक्कम व साहित्यही जप्त केले.

शाहूपुरी आणि सातारा शहर पोलिसांनी विविध ठिकाणच्या मटका अड्ड्यांवर छापे टाकून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यास सुरुवात केली आहे. ही मोहीम तीव्र स्वरुपात सुरू आहे.

सातारा शहर पोलिसांनी येथील खंडोबाच्या माळावरील गॅरेजच्या पाठीमागील मटका अड्ड्यावर छापा टाकून रोख रक्कम व साहित्य जप्त केले.

याप्रकरणी अविनाश निवृत्ती सकटे (रा. गुरुवार पेठ, सातारा) आणि चंदू ऊर्फ चंद्रकांत रमेश चोरगे (रा. लोणार गल्ली, सातारा) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. हवालदार राजाराम जाधव यांनी तक्रार दिली.

Web Title: Satara: Printed at Matta Station; Crime against the couple, filing of a complaint against two, cash and materials were seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.