सातारा : हजारो कार्यकर्त्यांसह शिवेंद्रसिंहराजे भोसले पोलीस मुख्यालयात, पोलीस अधीक्षकांसोबत बंद खोलीत चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2017 12:24 PM2017-10-06T12:24:53+5:302017-10-06T12:29:29+5:30
आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या 'सुरुचि' बंगल्याजवळ मध्यरात्री झालेल्या धुमश्चक्रीनंतर सकाळी उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रसिंहराजे भोसले या दोन्ही गटांनी एकमेकांविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलिसांनीही पुढाकार घेऊन या दोन्ही गटांविरुद्ध हत्येच्या प्रयत्नाची स्वतंत्र फिर्याद दाखल केली.
सातारा : आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या 'सुरुचि' बंगल्याजवळ मध्यरात्री झालेल्या धुमश्चक्रीनंतर सकाळी उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रसिंहराजे भोसले या दोन्ही गटांनी एकमेकांविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलिसांनीही पुढाकार घेऊन या दोन्ही गटांविरुद्ध हत्येच्या प्रयत्नाची स्वतंत्र फिर्याद दाखल केली. दरम्यान, शुक्रवारी (6 ऑक्टोबर) सकाळी 11.30 वाजण्याच्या सुमारास आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले हजार कार्यकर्त्यांसह पोलीस अधीक्षक कार्यालयात गेलेत.
सध्या पोलीस अधीक्षक संदीप पाटील व आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्यात बंद खोलीत चर्चा झाली. जवळपास अर्धा तास ही चर्चा सुरू होती. त्यामुळे पोलीस मुख्यालय परिसरात हजारो कार्यकर्ते जमा झाले होते. दरम्यान, गुरुवारी मध्यरात्री झालेला गोळीबार पोलिसांनी केला नाही, असे सांगितले गेल्यामुळे आता हा गोळीबार नेमका कोणत्या गटातील कार्यकर्त्याने केला, याचा शोध सुरू आहे.
शाहूपुरीकडून येणारा रस्ताही पोलिसांनी बंद केला आहे. सुरुचि व जलमंदिर परिसरातही कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. पोलीस अधीक्षकांशी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची बंद खोलीत चर्चा सुरू असताना पोलीस मुख्यालय परिसरात हजारो कार्यकर्ते जमले आहेत. अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.