आत्मविश्वास ढळल्यामुळेच शरद पवार माढ्यातून लढणार, चंद्रकांत पाटलांचा शाब्दीक वार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2019 07:23 AM2019-02-17T07:23:18+5:302019-02-17T07:24:38+5:30
पाटील म्हणाले, राष्ट्रवादीला लोकसभेला दोन अंकी आकडा गाठायचा आहे; पण ते शक्य नाही.
कऱ्हाड (जि. सातारा) : खरं तर शरद पवारांच्या वयाचा विचार करूनच त्यांनी आता लोकसभा निवडणुकीला उभं राहू नये, असं वक्तव्य मी केले होते; पण त्याचा त्यांना राग आला; पण खरं पाहता त्यांचा आत्मविश्वासच ढळला आहे. म्हणून ते स्वत: माढ्यातून लढण्याचा विचार करताहेत, असे प्रतिपादन महसूल व बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी येथे केले.
पाटील म्हणाले, राष्ट्रवादीला लोकसभेला दोन अंकी आकडा गाठायचा आहे; पण ते शक्य नाही. दस्तुरखुद्द राष्ट्रवादीच्या अध्यक्षांनाही दुसरे-तिसरे कोणी उभे करून उपयोग होणार नाही. म्हणून पवार परिवारातील स्वत: शरद पवार, मुलगी सुप्रिया अन् एक नातू असे तिघे रिंगणात उतरवायचा प्रयत्न सुरू आहे; पण त्याचा काही उपयोग होणार नाही. राजकारणात सगळे पत्ते एकदम ओपन करायचे नसतात. अगोदर त्यांनी रिंगणात उतरू देत. मग आमचा उमेदवार कोण, हे सांगतो, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.