सोनं रस्त्यावर सोडून ‘तिनं’ केला चोरट्यांचा पाठलाग

By admin | Published: March 8, 2015 12:11 AM2015-03-08T00:11:58+5:302015-03-08T00:15:20+5:30

भुर्इंज येथे रणरागिणीचा प्रताप : महिला दिनाच्या पूर्वसंध्येला महिलेचा थरारक प्रवास

Sona 'Tin' left on the street chases of thieves | सोनं रस्त्यावर सोडून ‘तिनं’ केला चोरट्यांचा पाठलाग

सोनं रस्त्यावर सोडून ‘तिनं’ केला चोरट्यांचा पाठलाग

Next

भुर्इंज : ज्यांनी येरवडा जेल फोडून भारतीय स्वातंत्र्यलढ्यात उत्तुंग झेप घेतली, त्या क्रांतिवीर देशभक्त किसन वीर यांच्या नावाने वसलेल्या किसनवीरनगर (भुर्इंज) येथील सुवर्णा गायकवाड यांच्या गळ््यातील गंठण हिसकावून घेण्याचा प्रयत्न झाला. पण डॅशिंग गायकवाड यांनी आपले मंगळसूत्र चोरट्यांच्या हाती जाऊ दिले नाहीच उलट त्या चोरट्यांना पकडण्यासाठी जो थरारक प्रवास त्यांनी केला.
किसनवीरनगर येथे राहणाऱ्या सुवर्णा गायकवाड यांचे सासर वाई तालुक्यातील लोहारे. सासरहून स्वत:ची दुचाकीवरून त्या परतत असताना वाईपासून काही अंतरावर शहाबागनजीक मागून आलेल्या दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या युवकाने त्यांच्या गळ््यातील गंठण हिसकावले. पण गायकवाड यांनी त्या चोरट्याचे हात पकडून आपले गंठण परत मिळविले. विशेष म्हणजे या सर्व घडामोडीत गायकवाड व चोरट्यांची दुचाकी चालूच होती. चोरट्यांचा प्रयत्न फसल्यानंतर गंठणचे पदक हातात घेऊन थांबलेल्या सुवर्णा गायकवाड काही क्षणच जागेवर थांबल्या. तोपर्यंत बाजूच्या रानात काम करणाऱ्या ऊसतोडणी मजूर व महिला धावत आल्या. हा सर्व प्रकार पाहणाऱ्या पाठीमागील एस. टी. तील चालकानेही गाडीही थांबवली.
गायकवाड यांनी चोरट्यांचा जोशीविहीरपर्यंत पाठलाग केला. या ठिकाणी पोलिसांनी नाकाबंदी केली होती. तेथे चौकशी केली असता त्यांना समजले की, एस. टी. तील कोणीतरी घडल्या प्रकाराबाबत भुर्इंज पोलिसांना कळवल्याने सहायक पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी नाकाबंदी केली होती. त्यावर गायकवाड यांनी हा प्रकार आपल्या स्वत:च्या बाबतीत घडल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी गायकवाड यांना त्यांची दुचाकी जोशीविहीर येथे थांबवून गाडीतून वाई येथे नेले. त्या प्रवासात वाटेत कुठे ते चोरटे दिसतात का, याचाही शोध घेतला. पोलिसांनी केलेल्या या सहकार्यामुळे गायकवाड यांनी वाई पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. सहायक पोलीस निरीक्षक गलांडे, पवार यांनी गायकवाड यांना पोलीस गाडीतून किसनवीरनगर येथे पोहोच करण्याची व्यवस्था केली.
गंठणाचे मणी विखुरले
चोरट्याच्या हातातून गंठण सोडवून घेताना ते तुटले आणि गंठणाचे मणी रस्त्यावर विखुरले होते. पण ऊसतोडणी मजूर महिलांना गायकवाड म्हणाल्या, ‘ते मणी तुम्ही घ्या, मी हे चोरटे कोण आहेत ते शोधायला जाते,’ असे सांगून त्या गेल्याही. चोरट्यांचा शोध घेत त्या जोशीविहीरपर्यंत आल्या.
धाडसाचे कौतुक
ही घटना महिला दिनाच्या पूर्वसंध्येला घडली. मणी जेव्हा रस्त्यावर सांडले तेव्हा ऊसतोडणी मजूर महिलांना ते मणी तुम्ही घ्या, असे सांगून चोरट्यांच्या पाठी धावणाऱ्या सुवर्णा गायकवाड याच्या धाडसाचे पोलिसांनीही कौतुक केले.

Web Title: Sona 'Tin' left on the street chases of thieves

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.