कोयनेतून 5 हजार 400 क्युसेक विसर्ग सुरू, धरणाचे सहा वक्र दरवाजे दोन फुटांनी उचलले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2018 06:32 PM2018-07-17T18:32:00+5:302018-07-17T18:34:28+5:30

कोयना धरण क्षेत्रात दमदार पाऊस होत असून धरणातील पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी आज दुपारी 4 वाजता धरणाचे सहा वक्र दरवाजे दोन फुटांनी उचलून नदीपात्रात पाणी सोडण्यास प्रारंभ करण्यात आला.

Starting 5,400 cusecs from the coon, the dam's six curved doors took two feet | कोयनेतून 5 हजार 400 क्युसेक विसर्ग सुरू, धरणाचे सहा वक्र दरवाजे दोन फुटांनी उचलले

कोयनेतून 5 हजार 400 क्युसेक विसर्ग सुरू, धरणाचे सहा वक्र दरवाजे दोन फुटांनी उचलले

Next
ठळक मुद्देकोयनेतून 5 हजार 400 क्युसेक विसर्ग सुरूधरणाचे सहा वक्र दरवाजे दोन फुटांनी उचलले

सातारा : कोयना धरण क्षेत्रात दमदार पाऊस होत असून धरणातील पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी आज दुपारी 4 वाजता धरणाचे सहा वक्र दरवाजे दोन फुटांनी उचलून नदीपात्रात पाणी सोडण्यास प्रारंभ करण्यात आला.

कोयना धरणात सध्या 77. 48 टीएमसी (76 टक्के) पाणीसाठा असून आगामी काळात  धरण लवकर भरुन पूर परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी पाणी पातळी साधारण 2139 फुटावर नियंत्रित करण्यात येणार आहे.

त्यासाठी आज धरणाच्या सहा वक्र दरवाजातून 5 हजार 400 क्युसेक आणि पायथा विद्युत गृहातून 2 हजार 100 क्यूसेक या प्रमाणे एकूण 7 हजार 500 क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात करण्यात येत आहे.

वक्र दरवाजे उचलून पाणी सोडण्या प्रसंगी सातारा सिंचन मंडळाचे अधीक्षक अभियंता वैशाली नारकर, कार्यकारी अभियंता कुमार पाटील आदी उपस्थित होते.

Web Title: Starting 5,400 cusecs from the coon, the dam's six curved doors took two feet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.