मठाधिपती संशयास्पदरीत्या बेपत्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2018 11:41 PM2018-07-03T23:41:10+5:302018-07-03T23:41:14+5:30
कºहाड : येथील मारुतीबुवा कराडकर मठाचे मठाधिपती बाजीरावमामा कराडकर हे संशयास्पदरीत्या बेपत्ता झाले आहेत. सोमवारी दुपारी बँकेत जाऊन येतो, असे सांगून ते मठातून बाहेर पडले. त्यानंतर ते परतलेच नसल्याची फिर्याद त्यांचे चुलते शरद बाबूराव जगताप यांनी कºहाड शहर पोलीस ठाण्यात दिली आहे. या घटनेने वारकरी सांप्रदायाला मोठा धक्का बसला असून, जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कºहाडमधील मारुतीबुवा कराडकर मठाचे मठाधिपती म्हणून गुरुवर्य बाजीराव बुवा गुरू मारुतीबुवा कराडकर हे गत दीड वर्षापासून काम पाहतात. मठाधिपती बाजीरावमामा हे शहरातील गुरुवार पेठेतील रहिवाशी असले तरी ते मठातच वास्तव्यास आहेत. सोमवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास ते मठातील सेवेकरी निखिल ढमाळ यांना, ‘मी कॉसमॉस बँकेत जाऊन येतो,’ असे सांगून मठातून बाहेर पडले. त्यानंतर सेवेकऱ्यांसह वारकºयांनी सायंकाळी उशिरापर्यंत
त्यांची वाट पाहिली. मात्र, ते परत
आले नाहीत. त्यामुळे सेवेकºयांनी बँक परिसरासह शहरात इतर ठिकाणी त्यांचा शोध घेतला. मात्र, ते कोठेही सापडले नाहीत. त्यामुळे याबाबतची माहिती रात्री उशिरा चुलते शरद जगताप यांना देण्यात आली.घटनेची माहिती मिळताच शरद जगताप यांच्यासह सेवेकरी आणि वारकरी मठात दाखल झाले. त्यांनीही मठाधिपतींचा शोध घेतला. मात्र, ते मिळून आले नाहीत. त्यामुळे अखेर रात्री उशिरा याबाबतची फिर्याद कºहाड शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली. पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत. याबाबत सहायक पोलीस निरीक्षक दीपिका जौंजाळ तपास करीत आहेत.
मठाच्या परिसरात पोलीस बंदोबस्त
मठाधिपती बाजीरावमामा कराडकर बेपत्ता झाल्याची माहिती मिळताच मंगळवारी सकाळपासून शेकडो वारकरी शहरातील मठात जमा होण्यास सुरुवात झाली. वारकºयांची संख्या मोठी असल्यामुळे मठाच्या परिसरात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच बेपत्ता मठाधिपतींच्या शोधासाठी पोलीस पथक ठिकठिकाणी शोधमोहीम राबवित आहे.
बँकेत पोहोचले; पण नंतर गायब
मठाधिपती बाजीरावमामा कराडकर हे बँकेत जाऊन येतो, असे सांगून मठातून निघून गेले होते. त्यामुळे सहायक निरीक्षक दीपिका जौंजाळ यांच्यासह पोलीस अधिकाºयांनी कॉसमॉस बँकेला भेट देऊन तेथील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यावेळी मठाधिपती बँकेत आल्याचे दिसून आले. मात्र, बँकेतून बाहेर पडल्यानंतर ते अचानक बेपत्ता झाले असल्याचे पोलिसांनी सांगितले.