आत्मविश्वास हरविलेल्या चालकांना पुन्हा प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2017 12:12 AM2017-09-02T00:12:50+5:302017-09-02T00:14:59+5:30

सातारा : राज्य परिवहन महामंडळाच्या फलटण आगाराला अपघातांनी घेरले आहे. अपघातांच्या मालिकेमुळे चालक-वाहकांचा आत्मविश्वास कमी होत चालल्याचे जाणवत आहे.

Training again lost confidence in drivers | आत्मविश्वास हरविलेल्या चालकांना पुन्हा प्रशिक्षण

आत्मविश्वास हरविलेल्या चालकांना पुन्हा प्रशिक्षण

Next
ठळक मुद्दे फलटणला अपघातांची मालिका : मानसिक स्थैर्यासाठी हवेत ध्यान अन् योगा प्रशिक्षणअपघातांच्या मालिकेचा चालकांच्या मानसिकतेवर किती परिणाम झालेला आहेझोपेत त्यांच्याकडे गाडी दिली तरी ते सफाईदारपणे चालवू शकतात.

जगदीश कोष्टी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : राज्य परिवहन महामंडळाच्या फलटण आगाराला अपघातांनी घेरले आहे. अपघातांच्या मालिकेमुळे चालक-वाहकांचा आत्मविश्वास कमी होत चालल्याचे जाणवत आहे. यावर उपाय म्हणून दोन दिवसांचे चालन प्रशिक्षण दिले जात आहे. हा उपाय तोकडा असून, चालक-वाहकांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी योगाचे प्रशिक्षण देण्याची गरज आहे.

फलटण आगारातील चालक रामदास सूर्यभान मेश्राम यांना सोमवार, दि. २१ आॅगस्ट रोजी गाडी चालवित असताना फीट आली. त्यामुळे झालेल्या अपघातात चाळीस प्रवासी जखमी झाले. त्यानंतर दुसºयाच दिवशी चौधरवाडीजवळ एसटी खड्ड्यात घुसली.
प्रवाशांना सिडीवरून बाहेर काढावे लागले. या अपघातात २४ प्रवासी जखमी झाले. पिसुरडीजवळ बुधवार, दि. २४ रोजी अपघातांची हॅटट्रिक साधली. कारच्या धडकेने तोल सुटल्याने एसटी खड्ड्यात गेली. त्यामध्ये पाचजण किरकोळ जखमी झाले होते. त्यानंतर पिंपरदजवळ एसटी-कार यांच्यात शुक्रवार, दि. १ रोजी अपघात झाला.

अपघातांच्या मालिकेचा चालकांच्या मानसिकतेवर किती परिणाम झालेला आहे, याची प्रचिती फलटण आगारात शुक्रवार, दि. २५ रोजी आली. फलटण-लोणंद एसटीच्या चालकाने वाहकाला स्थानकात सोडूनच गाडी मार्गस्थ केली. शेवटी वाहकाने मोटारसायकलवरून पाठलाग करून बस थांबविली.
या घटनेनंतर विभागाने जिल्ह्यातील चालकांसाठी दोन दिवसांचे वाहन चालविण्याचे प्रशिक्षण आयोजित केले. वास्तविक एसटीचे चालक वाहन चालविण्यात पारंगत आहेत. बहुतांश वेळा ते स्टिअरिंगवर बसलेले असतात. त्यामुळे झोपेत त्यांच्याकडे गाडी दिली तरी ते सफाईदारपणे चालवू शकतात. तरीही हे प्रशिक्षण का आयोजित केले? हा प्रश्न पडतो.

एसटी ही संस्था कामगार व प्रवाशांच्या जीवावर चालते. दोघेही माणसं असल्याने त्यांचं मानसिक स्वास्थ जपणे संस्थेचेच काम आहे. हीच गरज ओळखून प्रतापसिंह सावंत यांनी सातारा विभागाचे विभागीय वाहतूक अधिकारी व विभाग नियंत्रक असताना अनेक प्रयोग केले होते. चालकांसाठी वाहन चालविण्याचे प्रशिक्षण देण्याबरोबरच सर्व आगार व कार्यशाळेत ध्यान, योगाचे प्रशिक्षण आयोजित केले होते. दररोज सकाळी एक तास व सायंकाळी एक तास जादा वेळ देऊन कर्मचारी लाभ घेत होते.

चालकांचं आरोग्याकडं दुर्लक्ष
एसटीतील चालक-वाहक हे रस्त्यावरचे कर्मचारी आहेत. त्यांचे आरोग्य, आहार, विश्रांतीकडे नेहमीच दुर्लक्ष होते. त्यांच्या कामाच्या वेळा निश्चित नसतात. चांगले विश्रांतीगृह नाहीत. त्यामुळे त्यांना आरोग्याचे, ध्यान-साधनेचे महत्त्व पटवून देणे गरजेचे आहे. मानसिकदृष्ट्या बलवान ठरल्याने आत्मविश्वासाने ते एसटीची सेवा बजावतील. साहजिकच यात एसटीचाच विकास होणार आहे. त्यासाठी एसटीच्या वरिष्ठ अधिकाºयांनी चालक-वाहकांसाठी चाकोरीबाहेर जाऊन योगा, ध्यान साधनेचे आयोजन करणे गरजेचे आहे.

फलटण आगारातील घटनांनंतर सातारा विभागीय कार्यालयात जिल्ह्यातील चालकांसाठी दोन दिवसीय चालन प्रशिक्षण आयोजित केले आहे. आवश्यकता भासल्यास त्यामध्ये बदल केले जातील.
- अमृता ताम्हणकर
विभाग नियंत्रक, सातारा

Web Title: Training again lost confidence in drivers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.