काढणीवेळच्या पावसाने घेवडा अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2017 04:23 PM2017-10-05T16:23:36+5:302017-10-05T16:25:10+5:30

कोरेगावच्या घेवड्याला देशभरात नावलौकिक मिळाला. दिल्ली दरबारात मानाचे स्थान असलेल्या घेवडा यंदा ऐन काढणीवेळी आलेल्या पावसामुळे अडचणीत आला आहे. पिकांचे नुकसान झाले असून, मळणीपासून ते विक्रीपर्यंत खर्च तरी निघेल का नाही? ही चिंता सतावत आहे.

Trouble With Raining Rain | काढणीवेळच्या पावसाने घेवडा अडचणीत

काढणीवेळच्या पावसाने घेवडा अडचणीत

Next
ठळक मुद्देकोरेगावच्या राजमाचे नुकसान मळणीपासून ते विक्रीपर्यंतचा खर्च परवडेनाओल्या घेवड्यावर बुरशीउत्पादन खर्च परवडेना

पिंपोडे बुद्रुक (सातारा),5  : कोरेगावच्या घेवड्याला देशभरात नावलौकिक मिळाला. दिल्ली दरबारात मानाचे स्थान असलेल्या घेवडा यंदा ऐन काढणीवेळी आलेल्या पावसामुळे अडचणीत आला आहे. पिकांचे नुकसान झाले असून, मळणीपासून ते विक्रीपर्यंत खर्च तरी निघेल का नाही? ही चिंता सतावत आहे.


घेवड्याचे आगार म्हणून परिचित असलेल्या कोरेगाव तालुक्यातील उत्तरेकडील परिसरात खरीप व रब्बी अशा दोन्ही हंगामांत घेवड्याचे उच्चांकी उत्पादन घेतले जाते. यावर्षी खरीप हंगमातही घेवड्याची मोठ्या प्रमाणावर पेरणी झाली. परंतु ऐन काढणी काळात पडलेल्या पावसामुळे घेवड्याचे मोठे नुकसान झाले.


परिसरात आणखी काही ठिकाणी घेवडा काढणी तसेच मळणीचे काम सुरू आहे. पावसाच्या मिळालेल्या उघडीनंतर काढलेला घेवडा शेतकºयांनी झाकून ठेवलेला असला तरी आर्द्रतेमुळे त्यावर बुरशीचा प्रार्दुभाव झाला आहे. तसेच त्याला कोंब आले आहेत. पावसात भिजल्याने घेवड्याची मळणी करणे देखील त्रासदायक झाले आहे. एकूणच पावसामुळे घेवड्याचे मोठे नुकसान झाले आहे. याशिवाय मळणी केलेला घेवडा लाल पडल्याने व्यापाºयांनी मालाकडे पाठ फिरविली. यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. 

ओल्या घेवड्यावर बुरशी

मळणीनंतर ओलसर घेवडा पोत्यात भरला असता ते दडपून त्यावर बुरशीचा प्रार्दुभाव होतो. त्यासाठी घेवडा हवेशीर पसरून ठेवणे गरजेचे आहे. ओलसर घेवडा वाळविण्यासाठी उन्हात पसरला असता तो आणखी लाल पडण्याची शक्यता असते. त्यामुळे ओला घेवड्याचे करायचे काय? असा प्रश्न शेतकºयांना पडला आहे. 

उत्पादन खर्च परवडेना

मजुरांच्या मागणीच्या तुलनेत अपुरा पुरवठा, पावसामुळे होणारा कामाचा खोळंबा. परिणामत: वाढता मजुरी खर्च, वाहतूक खर्च, खते, बी-बियाणे, औषधे यांच्या वाढत्या किमती यामुळे घेवड्याचा उत्पादन खर्च वाढत आहे. याउलट घेवड्याला प्रतीकिलो मिळणारा ३० ते ३५ रुपये दर यामुळे उत्पादन खर्चही परवडत नाही. 
- सुरेश पवार,
नांदवळ, ता. कोरेगाव

Web Title: Trouble With Raining Rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.