वनसंज्ञा व सीआरझेड समित्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2017 06:47 PM2017-08-23T18:47:02+5:302017-08-23T18:47:02+5:30

सिंधुदुर्गनगरी दि.23 : वनसंज्ञा व सीआरझेड प्रश्नाबाबत पाहणी व माहिती तसेच जनतेच्या या प्रश्नाबाबत समस्यांची निवदने स्विकारण्यासाठी केंद्रीय पर्यावरण मंत्रालयातील श्री. नरेश कुमार, डेप्युटी इन्सपेक्टर जनरल (FOREST) वनसंज्ञा तसेच सीआरझेड बाबत अरविंद नोटियाल संचालक पर्यावरण मंत्रालय व त्यांच्या समवेत संबंधित अधिका-यांची टीम सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल झाली आहे.

Annexation and CRZ Committees filed in Sindhudurg district | वनसंज्ञा व सीआरझेड समित्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल

वनसंज्ञा व सीआरझेड समित्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल

Next
 
सिंधुदुर्गनगरी दि.23 : वनसंज्ञा व सीआरझेड प्रश्नाबाबत पाहणी व माहिती तसेच जनतेच्या या प्रश्नाबाबत समस्यांची निवदने स्विकारण्यासाठी केंद्रीय पर्यावरण मंत्रालयातील श्री. नरेश कुमार, डेप्युटी इन्सपेक्टर जनरल (FOREST) वनसंज्ञा तसेच सीआरझेड बाबत अरविंद नोटियाल संचालक पर्यावरण मंत्रालय व त्यांच्या समवेत संबंधित अधिका-यांची टीम सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल झाली आहे.

        या समित्या 24 ऑगस्ट रोजी सकाळी वनसंज्ञा तसेच सीआरझेड बाबत जिल्ह्यातील विविध ठिकाणी प्रत्यक्ष दौरा करुन पाहणी करणार आहेत. आज दुपारी या समिती सदस्यांनी जिल्हाधिकारी उदय चौधरी तसेच संबंधित अधिकारी वर्गाशी या प्रश्नाबाबत सविस्तर माहिती घेवून सखोल चर्चा केली. या समितीमार्फत उद्या 24 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समिती सभागृहात दुपारी 02.00 ते 04.00 वाजेपर्यंत जनतेची निवदने स्विकारण्यात येणार आहेत.

MCZMA पर्यावरण विभाग मंत्रालय मुंबई यांचेकडील अधिसूचना व त्यांनी नव्याने तयार केलेले 21 प्रारुप आराखडे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या www.sindhudurg.nic.in  या संकेतस्थळावर प्रसिध्द केले आहेत. सुधारीत आराखड्यानुसार इच्छुकांनी सीआरझेड बाबतची निवदने समितीस सादर करावीत असे आवाहन जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी केले आहेत.

Web Title: Annexation and CRZ Committees filed in Sindhudurg district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.