तळकोकणाला अवकाळीचा तडाखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2018 05:10 IST2018-03-15T05:10:51+5:302018-03-15T05:10:51+5:30
दक्षिणपूर्व अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने बुधवारी तळ कोकणात जोरदार पाऊस झाला. पुढचे चार दिवस म्हणजेच रविवारपर्यंत राज्यात विविध ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

तळकोकणाला अवकाळीचा तडाखा
पुणे : दक्षिणपूर्व अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने बुधवारी तळ कोकणात जोरदार पाऊस झाला. पुढचे चार दिवस म्हणजेच रविवारपर्यंत राज्यात विविध ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. कोकणात लांजा, राजापूर, कुडाळ, वैभववाडी, परिसरात जोरदार पाऊस झाला. वैभववाडी तालुक्यात सर्वत्र जोरदार सरी कोसळल्या. भुईबावडा परिसराला अक्षरश: झोडपून काढले. तर आखवणे-मौदे खो-यात वादळाने काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली.