ग्रामपंचायतीच्या मतदानावरील शिराळे ग्रामस्थांचा बहिष्कार मागे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2017 12:00 PM2017-10-16T12:00:29+5:302017-10-16T12:08:15+5:30
मतदान केंद्र बदलल्याच्या मुद्याबाबत तहसीलदार संतोष जाधव यांनी शिराळे ग्रामस्थांशी चर्चा केली. त्यावेळी उपस्थित लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत मतदान केंद्रात बदल का व केव्हा झाला. हे पटवून दिल्यानंतर शिराळे ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीच्या मतदानावरील बहिष्काराचा निर्णय मागे घेतला.
वैभववाडी, दि. १६ : मतदान केंद्र बदलल्याच्या मुद्याबाबत तहसीलदार संतोष जाधव यांनी शिराळे ग्रामस्थांशी चर्चा केली. त्यावेळी उपस्थित लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत मतदान केंद्रात बदल का व केव्हा झाला. हे पटवून दिल्यानंतर शिराळे ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीच्या मतदानावरील बहिष्काराचा निर्णय मागे घेतला.
सडुरे-शिराळे ही ग्रुप ग्रामपंचायत असून सडुरेपासून शिराळे गावाची वस्ती सुमारे सात किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे यापुर्वी शिराळेसाठी स्वतंत्र मतदान केंद्र होते. मात्र, ग्रामपंचायतीच्या प्रभाग पुर्रचनेत शिराळे आणि सडुरेतील एका वाढीचा प्रभाग क्रमांक ३ तयार करण्यात आला. त्यामुळे सडुरेतील त्या एका वाडीची मतदार संख्या शिराळेपेक्षा अधिक असल्याने प्रभाग क्रमांक ३ चे मतदान केंद्र्र सडुरे गावठाण शाळेत स्थलांतरीत करण्यात आले आहे.
मतदानावरील बहिष्काराचा निर्णय मागे
मतदान केंद्र्राचे स्थलांतर झाल्याबाबत भाजपचे नेते अतुल रावराणे, बंडू मुंडल्ये, विजय रावराणे, यांनी शिराळे ग्रामस्थांसमवेत तहसीलदार जाधव यांची भेट घेतली. यावेळी महेंद्र्र रावराणे, राजेंद्र्र रावराणे आदी उपस्थित होते. शिराळेतील मतदान केंद्राचा बदल एकाएकी कसा झाला? तसेच सद्यस्थितीत मतदान केंद्राचे ठिकाण पुर्ववत बदलता येईल का? अशी अशी विचारणा त्यांनी तहसीलदार जाधव यांना केली.
तांत्रिक बाबीमुळे केलेल्या या बदलाची प्रसिद्धी ग्रामपंचायतीच्या सूचना फलकावर करण्यात आली होती. तसेच मासिक सभेत सदस्यांच्या निदर्शनास आणून दिले होते. त्यावर सरपंच व सदस्यांच्या सह्या झाल्यावरच कोणताही आक्षेप नसल्याने प्रभाग रचना व मतदान केंद्र्राचा बदल अंतिम करण्यात आला. त्यामुळे त्या प्रभागातील सदस्यांनी ही बाब वेळीच ग्रामस्थांच्या लक्षात आणून द्यायला हवी होती.
किमान ८ दिवस आधी आपल्याशी संपर्क साधला असता तर आम्ही जिल्हाधिकाऱ्यामार्फत मतदान केंद्र्र पुर्ववत करण्याबाबत प्रयत्न केला असता. मात्र, आता काहीच बदल होणार नाही, असे तहसीलदार जाधव यांनी स्पष्ट केले.
त्यामुळे ग्रामपंचायत व शिराळे विभागाच्या सदस्यांनी लक्ष देऊन वेळीच पाऊल न उचलल्यामुळे अडचण झाल्याचे लक्षात आल्याने ग्रामपंचायतीच्या मतदानावरील बहिष्काराचा निर्णय मागे घेत सोमवारी मतदान करणार असल्याचे तहसीलदार जाधव यांच्यासमोर शिराळे ग्रामस्थांनी स्पष्ट केले.
शिराळे येथील मतदान केंद्र्राच्या स्थलांतराबाबत ग्रामस्थांनी तहसीलदार संतोष जाधव यांच्याशी चर्चा केली. त्यावेळी अतुल रावराणे, बंडू मुंडल्ये, विजय रावराणे उपस्थित होते.