माकडताप संशोधन केंद्र स्थापन

By admin | Published: March 20, 2017 05:42 PM2017-03-20T17:42:51+5:302017-03-20T17:42:51+5:30

केसरकरांनी केले आमदार राणे यांच्या आरोपांचे खंडन

Establishment of Monkeyhood Research Center | माकडताप संशोधन केंद्र स्थापन

माकडताप संशोधन केंद्र स्थापन

Next


आॅनलाईन लोकमत
सावंतवाडी, दि. २0 : माकडतापाने दगावलल्या माकडांची विल्हेवाट सीमेलगतच्या भागात लावल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माकडताप फैलावल्याचा आरोप आमदार नितेश राणे यांनी केला होता, हा आरोप पालकमंत्री दिपक केसरकर यांनी सोमवारी सावंतवाडी येथील पत्रकार परिषदेत फेटाळून माकडताप संशोधन केंद्र सरकारकडून स्थापनन केल्याची माहिती दिली.
सिंधुदुर्गचे प्रशासन मूळ कारण लपवत असल्याचा नितेश राणे यांनी गंभीर आरोप केला होता. यावर केसरकर यांनी जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा योग्य काम करत असल्याचे सांगून माकडताप संशोधन केंद्र सरकारकडून स्थापनन केल्याची माहिती दिली. लोकांना योग्य सुविधा उपलब्ध करुन देण्यास शासन कटिबध्द असल्याचेही ते म्हणाले.
नितेश राणे यांनी अशा वेळी आरोप करण्याऐवजी संकटसमयी आरोग्य यंत्रणेला धीर देउन पाठीशी रहाणे योग्य होते. यंत्रणा सक्षम असल्याचा पुनरुच्चारही त्यांनी केला. मुख्यमंत्र्यांनी माकडताप संशोधन केंद्र उभारुन कोकणी जनतेच्या पाठीशी राहून न्याय दिल्याचे त्यांनी सांगितले. माकडतापावरील हलगर्जीपणाचे सर्व आरोप पालकमंत्री केसरकर यांनी फेटाळून लावले.

Web Title: Establishment of Monkeyhood Research Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.