शाही गणेशोत्सवाची सांगता-आचरा येथील श्री देव रामेश्वर देवस्थानचा ४२ दिवसांचा गणराया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2017 10:09 PM2017-10-06T22:09:16+5:302017-10-06T22:13:27+5:30

आचरा : आचरा समुद्रकिनाºयावर काहीसे भावूक झालेले वातावरण..... पापण्यांच्या कडांवर ओथंबलेले ते अश्रू..... आणि बाप्पा जाऊ नये,

Ganesha Festival of Shani Ganeshotsav - 42 days Ganaraya of Sri Dev Rameshwar Devasthan in Achira | शाही गणेशोत्सवाची सांगता-आचरा येथील श्री देव रामेश्वर देवस्थानचा ४२ दिवसांचा गणराया

शाही गणेशोत्सवाची सांगता-आचरा येथील श्री देव रामेश्वर देवस्थानचा ४२ दिवसांचा गणराया

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
आचरा : आचरा समुद्रकिनाºयावर काहीसे भावूक झालेले वातावरण..... पापण्यांच्या कडांवर ओथंबलेले ते अश्रू..... आणि बाप्पा जाऊ नये, अशी काहीशी मनामध्ये घर करून राहिलेली भावना गुरुवारी सायंकाळी आचरा येथील इनामदार श्री देव रामेश्वर संस्थानच्या ४२ दिवसांच्या गणेशमूर्तीला निरोप देताना आचरावासीयांनी अनुभवली. यावेळी असंख्य भाविकांची भावूक स्थिती झाली होती.
हजारो भाविक व ग्रामस्थांच्या उपस्थितीत या गणेशमूर्तीचे समुद्रात विसर्जन करण्यात आले. तत्पूर्वी श्री देव रामेश्वर मंदिर ते आचरा-पिरावाडी समुद्रकिनारा अशी भव्य विसर्जन मिरवणूक काढण्यात आली.
जिल्ह्यात सर्वाधिक दिवस चालणारा गणेशोत्सव म्हणून आचरा येथील इनामदार श्री देव रामेश्वर संस्थानचा गणेशोत्सव प्रसिद्ध आहे. या उत्सवाच्या सागंता सोहळ्यानिमित्त विविध धार्मिक कार्येक्रम करण्यात आले. दुपारी १२ वाजता श्रींच्या मूर्तीचे उत्तरपूजन करण्यात आले. त्यानंतर दुपारी १ वाजता श्रींच्या विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ झाला. ढोलपथक व फटाक्यांच्या आतषबाजीत मिरवणूक समुद्रकिनारी सरकू लागली.@
विसर्जन मिरवणूक सुरळीत पार पडावी यासाठी आचरा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक एस. आर. धुमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.
मिरवणुकीत हिंदू बांधवांबरोबर गावातील मुस्लिम, ख्रिश्चन बांधवही सहभागी झाले होते. मिरवणूक पिरावाडी समुद्रकिनारी दाखल झाल्यानंतर श्री गणेशाची महाआरती करण्यात आली. यावेळी मंडळांनी भाविकांना प्रसाद म्हणून मोदक वाटप केले. मावळत्या सूर्याच्या साक्षीने
श्री गणेशमूर्तीचे समुद्रात विसर्जन करण्यात आले.
लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी समुद्रकिनारी भाविकांची एकच गर्दी झाली होती. यामुळे सागराबरोबर ‘जनसागरही’ उसळल्याचे चित्र होते.

सहा तास मिरवणूक
गणेश मिरवणूक रामेश्वर मंदिर ते आचरा तिठा, बाजारपेठमार्गे, भंडारवाडी, काझीवाडी, गाऊडवाडी, आचरा बंदरमार्गे पिरावाडी येथील श्री देव चव्हाट्यावर आली. यावेळी गणेशमूर्र्ती काही वेळ ठेवण्यात आली होती. येथे मच्छिमार बांधवांनी गणरायाचे दर्शन घेतले. सुमारे सहा तास सुरू असलेल्या या विसर्जन मिरवणुकीत स्थानिक भाविक, मुंबई, पुणे, कोल्हापूर, गोवा येथील भाविकही सहभागी झाले होते. ‘मंगल मूर्ती ....मोरया पुढच्या वर्षी लवकर या’ अशा घोषणांनी आचरा गाव दुमदुमून गेला होता.

Web Title: Ganesha Festival of Shani Ganeshotsav - 42 days Ganaraya of Sri Dev Rameshwar Devasthan in Achira

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.