गोमाता कामधेनूचा सेंद्रिय शेतीसाठी उपयोग

By admin | Published: January 14, 2015 10:19 PM2015-01-14T22:19:08+5:302015-01-14T23:21:24+5:30

माथूर : सावंतवाडीत शेतकऱ्यांना गोमातेचे फायदे

Gomata Kamdhenu uses organic farming | गोमाता कामधेनूचा सेंद्रिय शेतीसाठी उपयोग

गोमाता कामधेनूचा सेंद्रिय शेतीसाठी उपयोग

Next

सावंतवाडी : गोमाता-कामधेनूचा सेंद्रिय शेती व औषधासाठी मोठा उपयोग होत आहे. देशी गाय पालन करून जीवनात रोगमुक्त होण्यासाठी सर्वांनी एकजूट साधण्याची गरज राजस्थानमधील एक शेतकरी एस. आर. माथूर यांनी व्यक्त केले. यावेळी त्यांनी गोमूत्र, गोवर यांचे फायदे सांगितले. येथील श्रीधर अपार्टमेंट येथे एस. आर. माथूर यांनी गोमातेचे फायदे विषद केले. यावेळी सिंधुुदुर्गचे अ‍ॅग्रॉनिकचे अध्यक्ष बाबासाहेब परूळेकर, रामानंद शिरोडकर, रणजित सावंत, बाजीराव झेंडे, सचिन दळवी, आबा गवस, पंढरी राऊळ, रमाकांत मल्हार, धर्माजी गावडे, रमाकांत सातार्डेकर, लक्ष्मण परब, काका भिसे, सुबोध कारिवडेकर, अभिमन्यू लोंढे व शेतकरी उपस्थित होते. यावेळी माथूर म्हणाले, देशी गायीचे दूध मानवासाठी अमृत आहे, तर गोमुत्र, गोबराला शेती व माणसाच्या जीवनात फार महत्त्व आहे. गोमुत्रापासून विविध रोगांवर औषधे बनविली जातात. तसेच सेंद्रिय शेतीलाही गोमूत्राचे अनेक फायदे होतात. त्यामुळे गोमाता सर्वांसाठी खरी कामधेनू आहे. गायीच्या गोवरापासून गॅस, वीजनिर्मितीही होते. त्यामुळे गोमूत्र, गोवराला मोठी मागणी आहे, असे सांगितले. देशी गाय जंगलात चरण्यासाठी गेली असताना ती उघड्या वातावरणात फिरते. त्यामुळे निर्माण होणाऱ्या बॅक्टेरियाचा फायदा गोमूत्र, गोबऱ्यातून किं वा दूध पिल्याने मानव व सेेंद्रिय शेतीला होतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.
बाळासाहेब परूळेकर म्हणाले, कॅन्सरला गायीचा पहिला चीक फायद्याचा ठरतो. चीक, गोमूत्र, गोबर आदी औषध फवारणी करणारी कंपनी विकत घेण्यास तयार आहेत. देशी गायीचे अनेक फायदे उठविण्यासाठी सर्वांनीच चळवळ उभी करून विषमुक्त शेतीला प्राधान्य देऊया, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी रामानंद शिरोडकर, सचिन दळवी, बाजीराव झेंडे यांनी सेंद्रिय शेतीबाबत मार्गदर्शन केले. विषमुक्त अन्न निर्माण करण्यासाठी सेंद्रिय शेती चळवळ उभारण्याचा सर्वांनीच विचार मांडला. सेंद्रिय शेतीला प्राधान्य देताना शेतकऱ्यांची एकजूट व चळवळ उभारण्याचे आवाहन परूळेकर यांनी केले. यावेळी रणजित सावंत, काका भिसे, सुबोध कारिवडेकर, रमाकांत मल्हार, लक्ष्मण परब, आबा गवस, धर्माजी गावडे, आदींनी विचार मांडले. (वार्ताहर)

Web Title: Gomata Kamdhenu uses organic farming

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.