नाधवडे धरणाजवळ पट्टेरी वाघाच्या दर्शनाच्या निव्वळ अफवाच !

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2018 09:06 PM2018-02-18T21:06:14+5:302018-02-18T21:07:01+5:30

नाधवडे धरणाजवळ शनिवारी रात्री पट्टेरी वाघाच्या दर्शनाची छायाचित्रे व्हॉट्सअॅपवर फिरू लागताच कुतूहल तर निर्माण झालेच.

Nathawade dam near Rathorea Waghawarera rumah! | नाधवडे धरणाजवळ पट्टेरी वाघाच्या दर्शनाच्या निव्वळ अफवाच !

नाधवडे धरणाजवळ पट्टेरी वाघाच्या दर्शनाच्या निव्वळ अफवाच !

Next

वैभववाडी(सिंधुदुर्ग): नाधवडे धरणाजवळ शनिवारी रात्री पट्टेरी वाघाच्या दर्शनाची छायाचित्रे व्हॉट्सअॅपवर फिरू लागताच कुतूहल तर निर्माण झालेच. परंतु वनविभागासह परिसरातील नागरिकांची तारांबळही उडाली. मात्र, वनविभागाने त्याबाबत खात्री केल्यानंतर ती अफवा असल्याचे स्पष्ट होताच सा- यांनी सुटकेचा निःश्वास टाकला.

व्हॉट्सअॅपवर मध्यरात्रीपासून तळेरे-वैभववाडी-कोल्हापूर मार्गावर नाधवडे धरणासमोर पट्टेरी वाघाचे दर्शन झाल्याची 4 छायाचित्रे जोरात फिरवली जात होती. त्यामुळे दिवस उजाडताच वाघाच्या चर्चेने धुमाकूळ माजवला. ओळखी पाळखीचा प्रत्येकजण ती छायाचित्रे व्हॉट्सअॅपवर शेअर करीत होता. 'तळेरे वैभववाडी मार्गावर रात्री 11.15 वा वाघ दिसला. प्रवाशांनी खबरदारी घ्या' हा मेसेजही छायाचित्रांसोबत येत होता. त्यामुळे काहीसे कुतूहल आणि भीतीही पसरली होती. मात्र, छायाचित्रे काढणा-याचा मोबाईल नंबर अनेकांना विचारूनही दुपारपर्यंत तो कोणीच देऊ शकला नाही. त्यावरून ती अफवा असल्याची जाणीव झाली होती.

या घटनेबाबत वनपाल चंद्रकांत देशमुख यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर त्यांनी वनरक्षक प्रकाश पाटील यांना नाधवडेत पाठवून खात्री करण्यास सांगितले. त्यानुसार धरण परिसरात ते फिरले मात्र, पट्टेरी वाघच काय पण बिबट्यांच्याही पाऊलखुणा तेथे आढळून आलेल्या नाहीत. त्यामुळेच वनविभागानेही सुटकेचा निःश्वास टाकला. हीच छायाचित्रे गगनबावडा-कोल्हापूर मार्गावर वाघाचे दर्शन म्हणून दुपारनंतर काही व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये फिरवली जात होती. त्यामुळे संतापही व्यक्त होत होता. दरम्यान, वनखात्याच्या आतापर्यंतच्या सर्वेक्षणानुसार जिल्ह्यात पट्टेरी वाघांच्या अस्तित्वाबाबत कोणताही महत्त्वाचा पुरावा आढळून आलेला नाही. तो मोठ्या सावजाची शिकर करतो. तश्या प्रकारचा पाणी जंगली प्राण्याने मारल्याच्या घटनेचीही नोंद सिंधुदुर्ग वनविभागाकडे नाही, असे वनपाल चंद्रकांत देशमुख यांनी स्पष्ट केले.

Web Title: Nathawade dam near Rathorea Waghawarera rumah!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Tigerवाघ