Maharashtra Assembly Election 2019 : राष्ट्रवादीची बैठक भाजपच्या घरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2019 02:05 PM2019-10-17T14:05:47+5:302019-10-17T14:17:22+5:30

विधानसभा निवडणुकीची धामधूम अंतिम टप्प्यात असताना भाजपच्या पदाधिकाऱ्यांमधील सेनेविषयीची नाराजी आता उघड होऊ लागली आहे. यातूनच येथील उपनगराध्यक्ष निशिकांत भोजने यांच्या घरी चक्क राष्ट्रवादीचे उमेदवार शेखर निकम यांच्या प्रचारार्थ रात्री बैठक घेण्यात आली. त्यामुळे सेना-भाजपमधील फूट काहीशी उघड झाली आहे.

Nationalist meeting in BJP house | Maharashtra Assembly Election 2019 : राष्ट्रवादीची बैठक भाजपच्या घरात

Maharashtra Assembly Election 2019 : राष्ट्रवादीची बैठक भाजपच्या घरात

Next
ठळक मुद्देराष्ट्रवादीची बैठक भाजपच्या घरातचिपळूण मतदारसंघ, अंतर्गत धुसफूस अजूनही धुमसतेय

चिपळूण : विधानसभा निवडणुकीची धामधूम अंतिम टप्प्यात असताना भाजपच्या पदाधिकाऱ्यांमधील सेनेविषयीची नाराजी आता उघड होऊ लागली आहे. यातूनच येथील उपनगराध्यक्ष निशिकांत भोजने यांच्या घरी चक्क राष्ट्रवादीचे उमेदवार शेखर निकम यांच्या प्रचारार्थ रात्री बैठक घेण्यात आली. त्यामुळे सेना-भाजपमधील फूट काहीशी उघड झाली आहे.

येथील नगरपरिषदेत उपनगराध्यक्ष म्हणून निशिकांत भोजने हे महत्त्वाची भूमिका बजावत असून, भाजपचे पदाधिकारी म्हणूनही ते कार्यरत आहेत. २००९ च्या विधानसभा निवडणुकीत चिपळूण - संगमेश्वर मतदारसंघातून त्यांनी अपक्ष उमेदवारी लढवली होती.

सुमारे तीन हजाराहून अधिक मते त्यांनी वैयक्तिक स्वरूपात मिळवली होती. त्यांचा या मतदारसंघात आजही तितकाच जनसंपर्क आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे उमेदवार शेखर निकम यांचा त्यांनी सुरू केलेला प्रचार तितकाच परिणामकारक ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

जिल्ह्यातील शिवसेना - भाजप यांच्यातील कटुता संपल्याचे सांगितले जात असले तरी अंतर्गत धुसफूस अजूनही कायम असल्याचे दिसत आहे. त्यामुळे त्याचा परिणाम निवडणुकीत दिसण्याची चिन्हे आहेत.

जिल्ह्यातील पाचही जागांवर भाजपचा एकही उमेदवार नसल्याने पक्षात काहीशी नाराजी होती. मात्र, आजपर्यंत सेनेच्या विरोधात कोणीही भूमिका घेतलेली नसताना केवळ उपनगराध्यक्ष भोजने हे एकमेव असे पदाधिकारी आहेत. त्यामुळे याविषयी भाजपचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. दीपक पटवर्धन यांच्या भूमिकेकडेही लक्ष लागले आहे.
 

 

गेल्या दोन निवडणुकांमध्ये सेनेचे उमेदवार सदानंद चव्हाण यांचे प्रामाणिकपणे काम केले; मात्र त्यांनी आपल्या कामाची जराही दखल घेतली नाही. त्यातच आता भाजपला एकही उमेदवार दिला नाही. त्यामुळे आता आम्हालाही गृहीत धरून सेना काम करताना दिसत आहे. त्यामुळे आपले अस्तित्व काय आहे, हे दाखवून देण्यासाठी आपण ही भूमिका घेतली.
- निशिकांत भोजने,
उपनगराध्यक्ष चिपळूण

Web Title: Nationalist meeting in BJP house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.