कणकवलीत राष्ट्रवादी काँग्रेसचा इशारा, जनतेच्या समस्या मार्गी लावण्यासाठी प्रसंगी रस्त्यावर उतरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2017 04:30 PM2017-11-28T16:30:41+5:302017-11-28T16:43:20+5:30

केंद्र तसेच राज्यातील शिवसेना- भाजप युतीचे शासन सर्वच स्तरावर अपयशी ठरली आहे. केवळ पोकळ आश्वासने देऊन या शासनाने जनतेची फसवणूक केली आहे. कणकवली तालुक्यातील आरोग्य यंत्रणा कोलमडली आहे. खड्डेमय रस्ते, वीज समस्या या बरोबरच वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य जनतेला त्रास सहन करावा लागत आहे. बेरोजगारीही वाढतच चालली आहे, अशा समस्यांकड़े शासनाचे लक्ष वेधण्यासाठी कणकवली तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने मंगळवारी निवासी नायब तहसिलदार रविंद्र कडुलकर यांना निवेदन देण्यात आले. तसेच जनतेच्या समस्या मार्गी लावण्यासाठी वेळ प्रसंगी रस्त्यावर उतरून संघर्ष करू, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

 NCP's signal in Kankavali, on the streets to meet the problems of the people, be on the road | कणकवलीत राष्ट्रवादी काँग्रेसचा इशारा, जनतेच्या समस्या मार्गी लावण्यासाठी प्रसंगी रस्त्यावर उतरू

 कणकवली येथील तहसील कार्यालयात राष्ट्रवादीच्यावतीने मंगळवारी निवासी नायब तहसीलदार रविंद्र कडुलकर यांना निवेदन देण्यात आले. यावेळी अबिद नाईक, विलास गावकर, राजेश पाताड़े, दिलीप वर्णे आदी पदाधिकारी तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.

Next
ठळक मुद्देजनतेच्या समस्या सोडविण्यासाठी प्रसंगी रस्त्यावर उतरु : राष्ट्रवादी काँग्रेसचा इशारा कणकवलीत निवासी नायब तहसिलदाराना निवेदन कणकवल तहसील कार्यालयात पोलिस बंदोबस्त !

कणकवली : केंद्र तसेच राज्यातील शिवसेना- भाजप युतीचे शासन सर्वच स्तरावर अपयशी ठरली आहे. केवळ पोकळ आश्वासने देऊन या शासनाने जनतेची फसवणूक केली आहे. कणकवली तालुक्यातील आरोग्य यंत्रणा कोलमडली आहे. खड्डेमय रस्ते, वीज समस्या या बरोबरच वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य जनतेला त्रास सहन करावा लागत आहे. बेरोजगारीही वाढतच चालली आहे, अशा समस्यांकड़े शासनाचे लक्ष वेधण्यासाठी कणकवली तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने मंगळवारी निवासी नायब तहसिलदार रविंद्र कडुलकर यांना निवेदन देण्यात आले. तसेच जनतेच्या समस्या मार्गी लावण्यासाठी वेळ प्रसंगी रस्त्यावर उतरून संघर्ष करू, असा इशाराही यावेळी देण्यात आला.


राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष अबिद नाईक यांच्या नेतृत्वाखाली येथील तहसील कार्यालयाला मंगळवारी भेट देवून हे निवेदन देण्यात आले.यावेळी राष्ट्रवादी जिल्हा सरचिटणीस राजेश पाताड़े, तालुकाध्यक्ष विलास गावकर, ग्राहक सरंक्षण समिती जिल्हाध्यक्ष दिलीप वर्णे, शहर अध्यक्ष इम्रान शेख, युवक तालुकाध्यक्ष निशिकांत कडुलकर, तालुका उपाध्यक्ष सागर वारंग, अमित केतकर, गणेश चौगुले, सचिन अडुळकर, सचिन सदडेकर, सत्यवान कानडे, धनंजय पाताड़े, दीपेश सावंत, अभय गावकर, अंकुश मेस्त्री, बाळू मेस्त्री, जहीर फकीर आदी उपस्थित होते.

यावेळी निवासी नायब तहसिलदारांकडे राष्ट्रवादीच्यावतीने म्हणणे मांडताना अबिद नाईक म्हणाले, तालुक्या बरोबरच जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा पूर्णपणे कोलमडली आहे. शासकीय रुग्णालयात औषध पुरवठा नाही. महागाई गगनाला भिडली आहे. गॅस, पेट्रोलच्या किंमतींसह रोजच्या वापरातील जीवनाश्यक वस्तूंचे दर वाढतच चालले आहे. गुन्हेगारीही वाढत आहे. महिलांवरील अत्याचाराच्या प्रमाणातही कमालीची वाढ झाली आहे.

रस्त्यांवरील खड्डे हे नेहमीचेच दुखणे बनले आहे. यासह विज समस्या, विद्यार्थ्यांचे प्रश्न अशा अनेक समस्या आहेत. याबाबत तातडीने उपाययोजना करण्याबाबत आमच्या भावना शासन दरबारी पोहोचवाव्यात. नाहीतर येत्या काही दिवसात जनतेच्या समस्या न सुटल्यास राष्ट्रवादी काँग्रेस रस्त्यावर उतरून जनतेच्या साथीने संघर्ष करेल असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

तहसील कार्यालयात पोलिस बंदोबस्त !

राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने शासनाचा निषेध करीत कणकवली शहरातून मोर्चा काढण्यात येणार होता. मात्र, पोलिस प्रशासनाने जमाव बंदीचा आदेश असल्याचे कारण सांगून मोर्चाची परवानगी नाकारली होती. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने तहसिलदाराना निवेदन देताना कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिस उपनिरीक्षक सचिन नरूटे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसील कार्यालयात मंगळवारी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

 

Web Title:  NCP's signal in Kankavali, on the streets to meet the problems of the people, be on the road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.