देवगडात ३० पासून बिच महोत्सव, व्यापारी पर्यटन संस्थेचे आयोजन : शालेय विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2017 03:06 PM2017-12-21T15:06:08+5:302017-12-21T15:11:26+5:30
सरत्या वर्षाला निरोप व नववर्षाच्या स्वागतानिमित्त देवगड तालुका व्यापारी पर्यटन संस्थेच्यावतीने ३० व ३१ डिसेंबर रोजी देवगड बिच येथे जल्लोष २०१८ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. ३० रोजी सायंकाळी महोत्सवाचे उद्घाटन कोकण माती प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रकाश गायकवाड यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
देवगड : सरत्या वर्षाला निरोप व नववर्षाच्या स्वागतानिमित्त देवगड तालुका व्यापारी पर्यटन संस्थेच्यावतीने ३० व ३१ डिसेंबर रोजी देवगड बिच येथे जल्लोष २०१८ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
३० रोजी सायंकाळी महोत्सवाचे उद्घाटन कोकण माती प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रकाश गायकवाड यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यावेळी कणकवली विधानसभा मतदारसंघाचे आमदार नीतेश राणे यांची विशेष उपस्थिती आहे.
प्रमुख पाहुणे म्हणून नगराध्यक्षा प्रियांका साळसकर, तहसीलदार वनिता पाटील, पोलीस निरीक्षक जयकुमार सूर्यवंशी, उद्योजक नंदकुमार घाटे, ए.के.जे. फिशरीजचे एस.एम. बद्रुद्दीन, मत्स्योद्योगपती द्विजकांत कोयंडे, सहदेव बापर्डेकर, दिलीप भगत, सागर फडके, एकनाथ तेली, संदीप तेली, विनायक पारकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
३० डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजता शालेय चित्रकला स्पर्धा, सायंकाळी ५ वाजता वाळुशिल्प स्पर्धेचे उद्घाटन, ६.३० वाजता सोहळयाचे उद्घाटन, ७.३० वाजता नुपूर कलामंदिर (देवगड) उद्घाटनपर कार्यक्रम, ८ वाजता वाळुशिल्प स्पर्धेचे बक्षीस वितरण, ८.३० वाजता मँगो इव्हेंट, रत्नागिरी प्रस्तुत सेलिबे्रटी नाईट व सूर नवा, ध्यास नवा फेम मधुरा कुंभार यांचा कार्यक्रम प्रस्तुत होणार आहे.
३१ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता महिलांसाठी पाककला स्पर्धा, ६ वाजता पाककला स्पर्धेचे बक्षीस वितरण, ६.३० वाजता निलोफर खान प्रस्तुत डायमंड डान्स क्रु. मुंबई यांचा डान्सिंग धमाका, रात्री ९ वाजता नववर्ष भेटवस्तू वितरण, ९.३० वा. मॅप इव्हेंट प्रस्तुत आॅर्केस्ट्रॉ सूरसंगीत पार्श्वगायीका कविता निकम व सारेगम फेम सिध्दार्थ जाधव सहभागी होणार आहेत.
रात्री १२ वाजता फटाक्यांची आतषबाजी करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन तालुका व्यापारी पर्यटन संस्थेचे अध्यक्ष हनीफ मेमन व तालुका व्यापारी संघाचे अध्यक्ष प्रसाद पारकर यांनी केले आहे.
मधुरा कुंभार, कविता निकम ठरणार आकर्षण
या महोत्सवाला सूर नवा, ध्यास नवा फेम मधुरा कुंभार, सारेगम फेम सिध्दार्थ जाधव, पार्श्वगायिका कविता निकम यांचे विशेष आकर्षण ठेवण्यात आले आहे. त्याचप्रमाणे शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा, पाककला स्पर्धा, वाळू शिल्प स्पर्धा अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.