'पुन्हा फसवल्यास आत्मदहनाशिवाय पर्याय नाही'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2018 03:45 PM2018-04-12T15:45:29+5:302018-04-12T15:45:29+5:30

दोडामार्गवासीयांचा इशारा; आश्वासनाअंती उपोषण मागे

otherwise we would commit self immolation sindhudurg villagers threatens | 'पुन्हा फसवल्यास आत्मदहनाशिवाय पर्याय नाही'

'पुन्हा फसवल्यास आत्मदहनाशिवाय पर्याय नाही'

Next

सावंतवाडी : दोडामार्ग येथील केळीचे टेंब-धाटवाडी म्हावळणकरवाडी येथील रस्त्याचे खडीकरण ३० मेपर्यंत पूर्ण करण्यात येईल, असं आश्वासन तिलारी कालवा विभागाकडून स्थानिकांना देण्यात आलं आहे. याशिवाय रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचं काम २१ एप्रिलपासून सुरू करण्यात येणार असल्याचं आश्वासनही देण्यात आलं आहे. विभागाचे कार्यकारी अभियंता  राकेश धाकतोडे यांनी दिलेल्या आश्वासनानंतर नागरिकांनी उपोषण मागे घेतलं. मात्र पुन्हा फसवणूक झाल्यास आत्मदहनाचा इशाराही नागरिकांनी दिला. 

तिलारीचे मुख्य कार्यालय हे सावंतवाडीत आहे. या कार्यालयासमोर स्वाभिमान पक्षाचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष संजू परब, जिल्हा परिषदेचे माजी सभापती अंकुश जाधव, दोडामार्ग तालुकाध्यक्ष रमेश दळवी, दोडामार्गचे नगराध्यक्ष संतोष नानचे, उपनगराध्यक्षा साक्षी कोरगावकर यांच्यासह अनेक नागरिक गेले दोन दिवस उपोषण करत होते. पण त्यांना ठोस आश्वासन मिळत नव्हतं. नागरिकांनी तिलारी डाव्या कालव्याजवळील दोडामार्ग येथील केळीचे टेंब-धाटवाडी म्हावळणकरवाडी येथील रस्त्याचं खडीकरण करण्याबाबत आश्वासन दिलं होतं. पण ते आश्वासन पाटबंधारे अधिकाºयांनी पाळले नाही, असा आरोप करत पुन्हा आंदोलन सुरू केलं. मात्र गेले दोन दिवस कोणताही अधिकारी आंदोलनस्थळी फिरकला नसल्यानं आंदोलनकर्ते संतप्त झाले होते. त्यांनी आपला सर्व राग बुधवारी तिलारी विभागाचे कार्यकारी अभियंता राकेश धाकतोडे यांच्यावर काढला. तुम्हाला आंदोलनकर्त्यांची दया नाही. आम्ही येथे रस्त्यावर बसतो. जर आमच्यातील एकावर रस्त्यावरचा दगड उडाला तर त्याला जबाबदार कोण, असा सवाल करत जोपर्यंत आम्हांला न्याय मिळत नाही, तोपर्यंत आम्ही येथून उठणार नाही, असा पवित्रा घेतला. मात्र, कार्यकारी अभियंता धाकतोडे यांनी आंदोलनकर्ते संजू परब यांच्यासह नगराध्यक्ष संतोष नानचे यांच्याशी सविस्तर चर्चा केली. मात्र नंतर नागरिकांनी खडीकरणावर समाधान व्यक्त केले.

खडीकरणाच्या आश्वासनाचं पत्रही कार्यकारी अभियंता धाकतोडे यांनी नागरिकांनी दिलं. यात २१ एप्रिलपर्यंत केळीचे टेंब ते म्हाळवणकरवाडी या चार किलोमीटरमधील खड्डे बुजवले जाणार असून, ३० मेपर्यंत रस्त्यावर खडीकरण केले जाणार आहे. कार्यकारी अभियंता राकेश धाकतोडे यांनी तालुकाध्यक्ष संजू परब, भाजपचे नेते राजन म्हापसेकर यांच्या उपस्थितीत आश्वासनाचं पत्र उपोषणकर्त्यांना दिलं. या उपोषणात सावंतवाडी नगरसेवक उदय नाईक, विनया म्हावळणकर, अमिना देसाई, सुनील म्हावळणकर, संदेश गवस, इंद्रायणी नाईक, मदन कुंदेकर, चंद्रकांत म्हावळणकर, सुलक्षणा म्हावळणकर यांचा सहभाग होता
 

Web Title: otherwise we would commit self immolation sindhudurg villagers threatens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.