भातकापणी यंत्राचे प्रात्यक्षिक
By admin | Published: October 26, 2016 12:19 AM2016-10-26T00:19:36+5:302016-10-26T00:19:36+5:30
पेंडूर येथील कृषीरत्न बचत गट : मालवण तालुक्यातील पहिले भातकापणी यंत्र
चौके : मालवण तालुक्यातील पेंडूर येथील ‘कृषीरत्न स्वयंसहाय्यता बचत गट पेंडूर’ या प्रगतिशील शेतकऱ्यांनी दोन वर्षांपूर्वी स्थापन केलेल्या पुरुषांच्या बचतगटाने शेतीकामासाठी जाणवणारा मजुरांचा तुटवडा आणि वाढती मजुरी लक्षात घेऊन मालवण तालुक्यातील पहिले भातकापणी यंत्र (रीपर) खरेदी केले आहे.
यंत्राचे प्रात्यक्षिक बचतगटातील शेतकऱ्यांना पेंडूर येथे भात कापणी यंत्र कर्मचाऱ्यांकडून दाखविले. यावेळी कृषीरत्न स्वयंसहाय्यता बचतगट पेंडूरचे अध्यक्ष संजय नाईक, उपाध्यक्ष दीपक गावडे, जिल्हा परिषद सदस्या श्रावणी नाईक, महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाचे सहाय्यक व्यवस्थापक प्रसन्न कांबळी, कृषी सहाय्यक एस. जी. परब, कृषी अधिकारी व्ही. एस. सुतार, शेतकरी गजानन सावंत, विलास परब, विश्राम राणे, प्रदीप सावंत, उमेश सावंत, नितीन सावंत, संदेश नाईक, अरुण नाईक, शंकर नाईक, प्रकाश थवी, अशोक थवी, प्रकाश सरमळकर, बाळू राणे, मोहनीश परब, भद्रसेन लोके आदी उपस्थित होते. (वार्ताहर)
एक तासात एक एकर भातकापणी : संजय नाईक
हे भातकापणी यंत्र एक तासात एक एकर क्षेत्रावरील भात कापणी करू शकते. हे यंत्र खरेदी करण्यासाठी जिल्हा परिषद सदस्या श्रावणी नाईक आणि सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बॅँक कट्टा यांचे मोलाचे सहकार्य लाभले, अशी माहिती बचत गटाचे अध्यक्ष संजय नाईक यांनी यावेळी दिली.
आर्थिक उत्पन्नाचा बचतगटाचा मानस
४पेंडूर गावातील प्रगतिशील शेतकऱ्यांना एकत्र करुन त्यांचा आर्थिक विकास साधण्यासाठी दोन वर्षापूर्वी कृषीरत्न स्वयंसहाय्यता बचतगट पेंडूरची स्थापना करण्यात आली.
४त्यानंतर बचतगटाच्या माध्यमातून ऊसलागवड, कलिंगड लागवड, झेंडू शेती, काकडी, पडवळ, भाजीपाला यांची व्यापारी तत्त्वावर शेती करून बचतगटाने प्रोत्साहन दिले.
४भातकापणीसाठी मजुरांचा भासणारा तुटवडा तसेच वाढती मजुरी लक्षात घेऊन बचतगटाने एक लाख रुपये किमतीचे भातकापणी यंत्र खरेदी
केले.
४बचतगटातील सभासद शेतकऱ्यांना याचा चांगला फायदा होणार असून हे यंत्र भाडेतत्त्वावर देऊन आर्थिक उत्पन्न मिळविण्याचा बचतगटाचा मानस आहे.