कोळंब पूल दुरूस्ती लांबणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2017 12:54 AM2017-08-08T00:54:26+5:302017-08-08T00:54:31+5:30

Prolong the collision bridge repair | कोळंब पूल दुरूस्ती लांबणीवर

कोळंब पूल दुरूस्ती लांबणीवर

Next



लोकमत न्यूज नेटवर्क
मालवण : गेले आठ महिने अवजड वाहतुकीस बंद करण्यात आलेले कोळंब पूल दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहे. मालवण-देवगड तालुके जोडणाºया या पुलावरून अवजड वाहतूक बंद असल्याने व्यावसायिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. पुलाच्या दुरुस्तीसाठी साडेतीन कोटी रुपये मंजूर झाले असले तरी शासनाने काढलेल्या निविदांना अत्यल्प प्रतिसाद मिळाल्याने पुलाच्या दुरुस्तीचे काम लांबण्याची शक्यता आहे.
सर्जेकोट येथील भद्रकाली मच्छिमारी सहकारी सोसायटीचे अध्यक्ष गोपीनाथ तांडेल यांनी २७ जून रोजी कोळंब पुलाची तत्काळ दुरुस्ती करून वाहतुकीस खुला करण्यात यावा यासाठी उपोषण छेडले होते. यावेळी बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता प्रकाश चव्हाण यांनी निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यावर तत्काळ दुरुस्तीच्या कामाला सुरुवात केली जाईल. तसेच जानेवारी २०१८ पर्यंत काम पूर्ण करून अवजड वाहतूक सुरू करण्याबाबत नियोजनही करण्यात आल्याचे सांगितले होते.
मात्र निविदा प्रक्रिया मिळालेला अल्प प्रतिसाद पाहता कोळंब मार्गावरील शेकडो नागरिकांना अजूनही काही महिने पुलासाठी ‘प्रतीक्षा’ करावी लागणार आहे. कोळंब पूल अवजड वाहतुकीस धोकादायक बनल्याने
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाºयांनी पाहणी करून अवजड व प्रवासी वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर ही वाहतूक
आडारी-कातवडमार्गे वळविण्यात आली होती.
तर पुलावरून हलक्या वाहनांची वाहतूक सुरू राहण्यासाठी पुलाच्या दोन्ही बाजूस अडीच मीटर उंचीच्या लोखंडी कमानी लावण्यात आल्या आहेत. मात्र अज्ञात वाहनांच्या धडकेत अनेक अपघातही या पुलावर झाले आहेत.
पुन्हा तपासणी, पुन्हा निविदा
पूल दुरुस्तीसाठी काढण्यात आलेली निविदा एकाच ठेकेदाराने भरली. शासन नियमानुसार किमान तीन ठेकेदारांनी निविदा भरल्यास कमी किमतीची निविदा भरणाºया ठेकेदारास कामाचा ठेका दिला जातो. मात्र पूल दुरुस्तीसाठी पुलाच्या काही भागांची पुन्हा एकदा तपासणी करण्यात येणार असून अंदाजपत्रक बनविले जाईल. त्यानंतर पुन्हा निविदा प्रक्रिया राबविली जाईल, अशी माहिती बांधकामचे चव्हाण यांनी दिली.

Web Title: Prolong the collision bridge repair

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.