महाअवयवदान जनजागृतीसाठी सिधुदुर्गनगरीत महारॅली व पथनाट्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2017 02:26 PM2017-09-07T14:26:01+5:302017-09-07T16:33:48+5:30
अवयवदानाचे महत्व जनसामान्यापर्यंत पोहचविण्यासाठी आरोग्यविभागाची सिधुदुर्गनगरीत महारॅली व पथनाट्याचेच सादरीकरण करण्यात आले.
सिंधुदुर्गनगरी दि.07 : वैद्यकीय शिक्षण विभाग व सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र राज्य आणि विभागीय प्रत्यारोपण समन्वय समिती यांच्या संयुक्त विद्यमाने महाअवयव जनजागृतीसाठी सिंधुदुर्गनगरी येथे महारॅलीचे आयोजन करण्यात आले होते. अवयव दानाचे महत्व आणि याबाबतची जनजागृती महारॅली, पथनाट्यातून विषद करण्यात आली.
या महाअवयवदान रॅलीचे उद्द्याटन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एस. व्ही. कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले. ही रॅली सिंधुदुर्गगनरी जिल्हा रुग्णालय ते ओरोस फाटा पर्यंत काढण्यात आली.
यावेळी ओरोस फाटा येथे नर्सिग कॉलेजमधील विद्यार्थी - विद्यार्थींनी महाअवयवदान म्हणजे काय, अवयवदान का करावे, कुठे करावे याबाबत पथनाट्याच्या माध्यमातून जनतेला अवयव दानाचे महत्व पटवून दिले.
यावेळी या महाअवयव दान रॅलीत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक अविनाश नलावडे, आयुष अधिकारी कृपा गावडे, आरोग्य विभागातील संतोष सावंत, ए.आर. गावडे, अमित जगताप, संग्राम पाटील हे उपस्थित होते.
महाअवयवदान रॅलीत नर्सिग कॉलेज सिंधुदुर्गनगरी व कसाल नर्सिग कॉलेजचे विद्यार्थी - विद्यार्थींनी , जि. प आरोग्य विभाग , जिल्हा रुग्णालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.