सिंधुदुर्ग : काजूगर विक्रीचे दर घसरले, निर्यात घसरल्याचा परिणाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2018 02:07 PM2018-08-03T14:07:24+5:302018-08-03T14:11:59+5:30
काजूगर निर्यातीचा दर कमी झाल्याने व निर्यात घसरल्याने देशात काजूगर विक्रीचे दर घसरले आहेत. महाराष्ट्रातील काजू उद्योग सावरण्यासाठी महाराष्ट्र कॅश्यु असोसिएशनतर्फे शासनाकडे मागणी केली. सर्वंकष काजू उद्योगाचे धोरण ताबडतोब अमलात आणल्यास महाराष्ट्रातील काजू उद्योग सावरू शकेल, असे मत महाराष्ट्र कॅश्यू मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश बोवलेकर यांनी व्यक्त केले आहे.
सिंधुदुर्ग : काजूगर निर्यातीचा दर कमी झाल्याने व निर्यात घसरल्याने देशात काजूगर विक्रीचे दर घसरले आहेत. महाराष्ट्रातील काजू उद्योग सावरण्यासाठी महाराष्ट्र कॅश्यु असोसिएशनतर्फे शासनाकडे मागणी केली. सर्वंकष काजू उद्योगाचे धोरण ताबडतोब अमलात आणल्यास महाराष्ट्रातील काजू उद्योग सावरू शकेल, असे मत महाराष्ट्र कॅश्यू मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश बोवलेकर यांनी व्यक्त केले आहे.
काजू उद्योगाला निर्यातदर घसरल्याने मोठा फटका बसला आहे. याबाबत सुरेश बोवलेकर म्हणाले, यावर्षीच्या म्हणजे २०१८ च्या सुरुवातीला काजूगर निर्यातीचा दर घटला. व्हीएतनामकडून होणारा निर्यात काजूगर अमेरिका व इतर देशांनी क्वालिटी चांगली नसल्याने कमी निर्यात झाला. त्याचा परिणाम काजू बीच्या जागतिक बाजारपेठेवर झाला आहे. त्यामुळे यावर्षी गतवर्षातील सर्वात कमी दर काजू बीला मिळत आहे आणि काजू उद्योगासाठी ते धोक्याचे आहे.
आर्थिक संकटाची भीती व्यक्त
काजू बीचा मुळातच खरेदीचा जास्त दर, वाळविण्याची तूट यामुळे उत्पादन किंमत वाढली गेल्याने आणि इतर राज्यातून म्हणजेच कर्नाटक, आंध्रप्रदेश, ओरिसा, तामिळनाडू येथून कमी दराने येणारा काजूगर यामध्ये मोठी तफावत असल्यामुळे कमी दराचा काजूगर विक्री होऊ लागला आहे.
त्याचबरोबर निर्यात काजूगराचा दर मोठ्या प्रमाणात उतरल्यामुळे तो काजूगर महाराष्ट्रात तसेच देशाच्या अन्य राज्यात विक्रीसाठी कमी दराने उपलब्ध होत आहे. त्यामुळे अर्थातच महाराष्ट्रात मोठ्या दराने काजू बी घेतलेल्या उद्योगांकडे त्यांच्या निर्मितीच्या किमतीच्या कमी दराने काजूगर विकावा लागल्याने आर्थिक संकटाची भीती व्यक्त होत आहे.
काजू बी खरेदीमध्ये मोठमोठे प्रक्रिया उद्योग मागे सरले. मात्र, महाराष्ट्रातील काजू पीक कमी या गोष्टीमुळे व खरेदीच्या स्पर्धेमुळे महाराष्ट्रातील काजू बीचा दर वाढत गेला. यासाठी काजूबद्दल सर्वंकष विकासाचे धोरण शासनाने त्वरित अमलात आणून काजू उद्योगांना नवसंजीवनी प्राप्त करून द्यावी.
- सुरेश बोवलेकर,
काजू असो. अध्यक्ष