सिंधुदुर्ग : देवगड किनाऱ्यावर महाकाय लाटांचे तांडव, किनारपट्टी भागातील रस्त्यांवर पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2018 01:04 PM2018-07-16T13:04:55+5:302018-07-16T13:08:52+5:30

अमावास्येची भरती व समुद्रकिनारी महाकाय उंचीच्या लाटा धडकत असल्याने देवगड किनारपट्टी भागातील रस्त्यांवर पाणी आले.

Sindhudurg: Great waves on the banks of Devgad, orange streets, and water in the coastal areas | सिंधुदुर्ग : देवगड किनाऱ्यावर महाकाय लाटांचे तांडव, किनारपट्टी भागातील रस्त्यांवर पाणी

किनारपट्टीलगतच्या जामसंडे कावलेवाडी मार्गावर धडकत असलेल्या महाकाय लाटांचे तांडव दिसत आहे.

Next
ठळक मुद्देदेवगड किनाऱ्यावर महाकाय लाटांचे तांडवकिनारपट्टी भागातील रस्त्यांवर पाणी

देवगड : अमावास्येची भरती व समुद्रकिनारी महाकाय उंचीच्या लाटा धडकत असल्याने देवगड किनारपट्टी भागातील रस्त्यांवर पाणी आले.

अमावास्येच्या महाकाय भरतीच्या वाढलेल्या पाण्याबरोबरच १२ ते १४ फूट उंचीच्या धडकत असलेल्या लाटांचा फटका किनारपट्टी भागाला बसला.

हवामान विभागाकडून आलेल्या संदेशामध्ये २० किलोमीटरपर्यंत १२ फूट उंचीच्या लाटा व ताशी ३३ किलोमीटर वेगाने वारे वाहणार व २० ते ५० किमीपर्यंत १४ फूट उंचीच्या लाटा व ताशी ३७ किलोमीटर वेगाने वारे वाहणार असल्याची माहिती देण्यात आली.

त्यानुसार किनारपट्टी भागात सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या. जामसंडे कावलेवाडी मार्गावर धडकत असलेल्या महाकाय लाटांमुळे या मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.

Web Title: Sindhudurg: Great waves on the banks of Devgad, orange streets, and water in the coastal areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.