सिंधुदुर्ग : कोकणात होलिकोत्सव, खेळे, शबय, गोमूनृत्य, तमाशा आणि गावरहाटी, पंधरा दिवस धूम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2018 08:25 PM2018-03-03T20:25:53+5:302018-03-03T20:25:53+5:30
कणकवली शहरासह सिंधुदुर्ग जिल्ह्यात गुरुवारी मोठ्या उत्साहात होलिकोत्सवाला प्रारंभ झाला. होळी रे होळी , पुरणाची पोळी अशा विविध आरोळ्या ठोकत परंपरागत पध्दतीने जिल्ह्यात ठिकठिकाणी पौर्णिमेच्या दिवशी होळी उभारण्यात आली. व तिची विधिवत पूजा करण्यात आली.
कणकवली : शहरासह सिंधुदुर्ग जिल्ह्यात गुरुवारी मोठ्या उत्साहात होलिकोत्सवाला प्रारंभ झाला. होळी रे होळी , पुरणाची पोळी अशा विविध आरोळ्या ठोकत परंपरागत पध्दतीने जिल्ह्यात ठिकठिकाणी पौर्णिमेच्या दिवशी होळी उभारण्यात आली. व तिची विधिवत पूजा करण्यात आली.
कोकणात होलिकोत्सव हा सण महत्त्वपूर्ण समजला जातो. विविध ठिकाणी पाच, सात, पंधरा दिवस या होळी उत्सवाची धूम पहायला मिळते. त्यात खेळे, शबय, गोमूनृत्य, तमाशा आणि गावरहाटी प्रमाणे विविध धार्मिक कार्यक्रम होत असतात. या उत्सवाच्या निमित्ताने गावोगावी मुंबईकर मंडळी दाखल झाली आहेत.
तांदळाच्या शेवया आणि नारळाच्या खोबºयाचा रस तसेच पुरणपोळ्या अशा लज्जतदार खाद्य पदार्थांचे बेत आखले जात आहेत. त्यामुळे सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे. वाढत्या महागाईचा काहीसा फटका जरी बसत असला तरी काटकसर करून अनेक नागरिक हा उत्सव साजरा करताना दिसत आहेत.
गावातील होळीचे मांड रात्रीच्या वेळी गर्दीमुळे गजबजून जात आहेत. तर अनेक ठिकाणी ग्रामदेवतांच्या मंदिरांच्या परिसरात असलेल्या होळीच्या मांडांच्या ठिकाणी विविध धार्मिक तसेच सांस्कृतिक कार्यक्रम होत आहेत. त्यामुळे सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे.