सिंधुदुर्ग : वैद्यकीय अधिकारीही आंदोलनात सहभागी होणार, एनआरएचएमचे आंदोलन सुरुच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2018 04:24 PM2018-04-19T16:24:25+5:302018-04-19T16:24:25+5:30

आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी जिल्ह्यातील एनआरएचएमचे कर्मचारी व अधिकारी यांनी १२ एप्रिलपासून सुरू केलेले बेमुदत कामबंद आंदोलन बुधवारी सातव्या दिवशीही सुरू होते.

 The Sindhudurg Medical Officer will also participate in the agitation, the movement of NRHM has been started | सिंधुदुर्ग : वैद्यकीय अधिकारीही आंदोलनात सहभागी होणार, एनआरएचएमचे आंदोलन सुरुच

सातव्या दिवशीही कामबंद आंदोलनात सहभागी झालेल्या एनआरएचएमचे अधिकारी व कर्मचारी त्यांच्याशी खासदार विनायक राऊत यांनी चर्चा केली. यावेळी आमदार वैभव नाईक व अन्य उपस्थित होते.

Next
ठळक मुद्देवैद्यकीय अधिकारीही आंदोलनात सहभागी होणारएनआरएचएमचे आंदोलन सातव्या दिवशीही सुरुच

ओरोस : आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी जिल्ह्यातील एनआरएचएमचे कर्मचारी व अधिकारी यांनी १२ एप्रिलपासून सुरू केलेले बेमुदत कामबंद आंदोलन बुधवारी सातव्या दिवशीही सुरू होते.

या आंदोलनाची तीव्रता वाढत असून एनआरएचएम अंतर्गत प्राथमिक आरोग्यकेंद्रात काम करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यानी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. २१ एप्रिलपर्यंत मागण्या मान्य न झाल्यास या कामबंद आंदोलनात सहभागी होणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

एनआरएचएम कर्मचाऱ्याना विनाअट शासनसेवेत सामावून घ्यावे, सेवेतील अनुभवी व प्रशिक्षित कर्मचाऱ्याना शासनाच्या सरळसेवा भरतीत प्राधान्य द्यावे, त्यासाठी असलेली वयाची अट शिथिल करावी, कामावर आधारित सुधारित गुण पद्धत बंद करावी. समान काम-समान वेतन कायदा लागू करावा, आरोग्य विभागाचे खासगीकरण करू नये, सेवेतील महिला कर्मचाºयांना १८० दिवसांची गरोदर व प्रसुती रजा द्यावी, अशा मागण्या या संघटनेच्या आहेत.

या मागण्यांच्या पूर्ततेसाठी या कर्मचाऱ्यानी सुरू केलेले कामबंद आंदोलन बुधवारी सातव्या दिवशी सुरू होते. या आंदोलनाला बुधवारी खासदार विनायक राऊत यांनी भेट दिली. २१ रोजी मंत्रालयात होणाऱ्या बैठकीला आपण स्वत: व आमदार नाईक उपस्थित राहून आपल्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याची ग्वाही दिली.

या आंदोलनात आम्ही वैद्यकीय अधिकारी प्रत्यक्ष सहभागी नसलो तरी आंदोलनाला आमचा जाहीर पाठिंबा आहे. २१ रोजी होणाऱ्या बैठकीत योग्य तो निर्णय न झाल्यास आम्ही या आंदोलनात उतरण्याचा निर्णय घेऊ. तूर्तास आम्ही अतितत्काळ रुग्ण सेवा देत असून बाह्य रुग्ण सेवा पूर्णत: बंद केली असल्याचे डॉ. कृपा गावडे यांनी स्पष्ट केले.

रुग्णसेवेवर कोणताही परिणाम नाही : डॉ. साळे

कामबंद आंदोलनात एनआरएचएम कर्मचारी सहभागी असले तरी नियमित कर्मचारी कार्यरत आहेत. त्यामुळे या आंदोलनाचा रुग्ण सेवेवर कोणताही परिणाम झालेला नाही. मात्र प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी या आंदोलनात सहभागी झाल्यास रुग्ण सेवेवर नक्कीच परिणाम होणार असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांनी स्पष्ट केले.

 

Web Title:  The Sindhudurg Medical Officer will also participate in the agitation, the movement of NRHM has been started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.