सिंधुदुर्ग, रत्नागिरी किनारपट्टीवर सुरक्षा ; पोलिसांची अतिदक्षता मोहीम : सागरी सुरक्षेचा घेतला आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2017 10:58 PM2017-12-22T22:58:31+5:302017-12-22T22:59:46+5:30

मालवण : २६/११ सारखे दहशतवादी हल्ले समुद्रातच परतवून लावण्यासाठी सागरी सुरक्षा यंत्रणा सक्षम करण्यात आली आहे. या सागरी सुरक्षेचा वेळोवेळी आढावा घेतला जातो.

 Sindhudurg, Ratnagiri coastline security; Police Superintendence Campaign: Review of the sea safety review | सिंधुदुर्ग, रत्नागिरी किनारपट्टीवर सुरक्षा ; पोलिसांची अतिदक्षता मोहीम : सागरी सुरक्षेचा घेतला आढावा

सिंधुदुर्ग, रत्नागिरी किनारपट्टीवर सुरक्षा ; पोलिसांची अतिदक्षता मोहीम : सागरी सुरक्षेचा घेतला आढावा

googlenewsNext
ठळक मुद्देमालवणात शुक्रवारी किनारपट्टीवर विशेष मोहीम किनारपट्टीवर सकाळी ८ ते सायंकाळी ६ या वेळेत प्रत्यक्ष प्रशिक्षण

मालवण : २६/११ सारखे दहशतवादी हल्ले समुद्रातच परतवून लावण्यासाठी सागरी सुरक्षा यंत्रणा सक्षम करण्यात आली आहे. या सागरी सुरक्षेचा वेळोवेळी आढावा घेतला जातो. या पार्श्वभूमीवर विशेष अशा अतिदक्षता मोहिमेच्या माध्यमातून सिंधुदुर्ग पोलिसांनी मालवणात शुक्रवारी किनारपट्टीवर विशेष मोहीम राबविली.

बुधवारी २० रोजी या मोहिमेचा शुभारंभ पोलीस अधीक्षक दिक्षितकुमार गेडाम यांच्या हस्ते करण्यात सिंधुदुर्ग नगरी येथे करण्यात आला होता. त्यानंतर ३ दिवस पोलीस अधीक्षक कार्यालयात सागरी सुरक्षेच्यादृष्टीने शोध बचाव व मुकाबला याबाबतचे प्रशिक्षण अधिकारी व कर्मचारी यांना देण्यात आले.

या तीन दिवसीय प्रशिक्षणा नंतर शुक्रवारी मालवण किनारपट्टीवर सकाळी ८ ते सायंकाळी ६ या वेळेत प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यात आले. दहशतवाद्यांशी कसा सामना करायचा याचे प्रात्यक्षिक देण्यात आले.या प्रात्यक्षिक कार्यक्रमात पोलिसांच्या तीन स्पीड बोट, प्रतिकात्मक स्वरूपात आतंकवाद्यांची बोट मोहिमेत होती. सागरी सुरक्षेच्यादृष्टीने किनारपट्टीवरील पोलीस अधिकाºयांना गुजरात येथे विशेष प्रशिक्षण देण्यात आले होते. त्या प्रशिक्षणा नुसार सिंधुदुर्ग, रत्नागिरी किनारपट्टीवर ही विशेष मोहीम राबविल्याची माहिती अधीक्षक प्रकाश गायकवाड यांनी दिली.

अधिकारी सहभागी
यावेळी सिंधुदुर्ग अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रकाश गायकवाड, रत्नागिरी जिल्हा अतिरिक्त पोलीस अधीक्षक मितेश घट्टे, उपविभागीय पोलीस अधिकारी पद्मजा चव्हाण, मोरे, गवस, कोस्टगार्ड कमांडर अभिषेक करूणाकर, पोलीस निरीक्षक अरविंद बोडके, २० अधिकारी, ३३ कर्मचारी या मोहिमेत सहभागी झाले होते.

Web Title:  Sindhudurg, Ratnagiri coastline security; Police Superintendence Campaign: Review of the sea safety review

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.