सिंधुदुर्ग : सावंतवाडी पालिका सभेत नाणारविरोधी ठराव बारगळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2018 03:14 PM2018-07-27T15:14:37+5:302018-07-27T15:17:30+5:30

सावंतवाडी नगरपालिकेचे काँग्रेसचे नगरसेवक डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी नाणार प्रकल्पाविरोधी ठराव घेण्याचा आग्रह केला. मात्र, नगराध्यक्षांनी तो टोलवून लावला.

Sindhudurg: In the Sawantwadi Municipality meeting, anti | सिंधुदुर्ग : सावंतवाडी पालिका सभेत नाणारविरोधी ठराव बारगळला

सिंधुदुर्ग : सावंतवाडी पालिका सभेत नाणारविरोधी ठराव बारगळला

googlenewsNext
ठळक मुद्देसावंतवाडी पालिका सभेत नाणारविरोधी ठराव बारगळलाजयेंद्र परुळेकर आक्रमक, शिवसेना नगरसेवकांचे मौन

सिंधुदुर्ग : सावंतवाडी नगरपालिकेचे काँग्रेसचे नगरसेवक डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी नाणार येथील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाला केलेल्या विरोधावरून पालिका सभेत मतमतांतरे पहायला मिळाली. परुळेकर यांनी नाणार प्रकल्पाविरोधी ठराव घेण्याचा आग्रह केला. मात्र, नगराध्यक्षांनी तो टोलवून लावला. बैठकीत शिवसेना नगरसेवक मात्र मूग गिळून गप्प बसल्याचे दिसून आले. त्यामुळे पुढील बैठकीत नाणारवर चर्चा घडवून आणावी, असा आग्रह परुळेकर यांनी धरला आहे.

सावंतवाडी नगरपालिकेची मासिक सभा नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी प्रभारी मुख्याधिकारी संतोष जिरगे, उपनगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर, नगरसेवक राजू बेग, बाबू कुडतरकर, मनोज नाईक, सुरेंद्र बांदेकर, आनंद नेवगी, सुधीर आडिवरेकर, उदय नाईक, नगरसेविका शुभांगी सुकी, माधुरी वाडकर, भारती मोरे, अनारोजीन लोबो, दीपाली भालेकर, समृध्दी विर्नोडकर आदी उपस्थित होते.

बैठकीच्या सुरुवातीला राजमाता सत्त्वशिलादेवी भोसले यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर विविध विषयांचे वाचन करण्यात आले. त्यात यापुढे राज्य सरकारच्या शासन निर्णयानुसार कोणतीही निविदा ही मासिक बैठकीत न येता स्थायी समितीतच मंजूर करण्यात येणार आहे, असे सांगण्यात आले. हा निर्णय वाचून दाखविण्यात आला. तसेच विविध विकासकामांनाही मंजुरी देण्यात आली. तसेच सेव्हन स्टार रॉकिंगमध्ये चांगले काम करून सावंतवाडी नगरपालिका स्वच्छतेत अग्रक्रमावर आणण्याचे यावेळी ठरविण्यात आले. मात्र, नाणारवर चर्चा सुरू असताना शिवसेना सदस्य मात्र गप्प होते. आपणास नाणारवर काहीच कळत नाही असेच ते अप्रत्यक्षपणे सांगत होते.


विरोध करण्यापूर्वी बाजू ऐकून घेणे आवश्यक

आयत्या वेळच्या विषयावेळी परुळेकर यांनी नाणार प्रकल्प हा प्रदूषणकारी आहे. यामुळे सिंधुदुर्गचा एक तालुका बाधित होणार आहे. त्यामुळे या प्रकल्पाविरोधी ठराव घ्या, अशी मागणी केली. मात्र याला नगरसेवक आनंद नेवगी यांनी अद्याप प्रकल्प झाला नाही. तसेच यावर अभ्यास सुरू आहे, असे सांगितले. तर नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी एखाद्याला विरोध करण्यापूर्वी त्याची बाजूही ऐकून घ्यावीच लागेल, असे सांगत नाणारविरोधी ठराव टोलवून लावला.

Web Title: Sindhudurg: In the Sawantwadi Municipality meeting, anti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.