दशावतारी नाट्यमहोत्सवास ओरोस वासियांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
By Admin | Published: April 17, 2017 06:11 PM2017-04-17T18:11:38+5:302017-04-17T18:11:38+5:30
बक्षिस वितरण समारंभ २४ एप्रिल २०१७ रोजी
आॅनलाईन लोकमत
सिंधुदुर्गनगरी, दि. १७: महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळामार्फत ओरोस-सिंधुदुर्गनगरी येथील श्री देव रवळनाथ मंदिरात आयोजित दशावतार नाट्यमहोत्सवास ओरोस वासियांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. सोमवार दिनांक ३ एप्रिल २०१७ पासून या दशावतारी नाट्य महोत्सवास सुरवात झाली आहे.
श्री. गणेश दशावतारी नाट्यमंडळ कडावल, सत्वपरीक्षा, श्री देवी माऊली दशावतारी नाट्यमंडळ इन्सुली, मायाजाल, श्री. देव गांगोबा दशावतारी नाट्यमंडळ ओवळीये, ललीत पंचमी, लिंग रामेश्वर दशावतारी नाट्यमंडळ ओवळीये-मालवण, यक्ष यक्षिणी, महापुरूष दशावतारी नाट्यमंडळ सावंतवाडी, रामभक्त जांबुवंत, सावरीश्वर दशावतारी नाट्यमंडळ आवेरे, कंदुकेश्वरी महिमा, श्री. देव वेतोबा, रवळनाथ, भावई द. नाट्यमंडळ परूळे, लक्ष्मीची पाऊले, श्री. देव हनुमान दशावतारी नाट्यमंडळ कलंबिस्त, भीष्म परशुराम युध्द, रामेश्वर दशावतारी नाट्यमंडळ तसेर्बांबर्डे, भिष्म प्रतिज्ञा, स्वयंभू दशावतारी नाट्यमंडळ पांग्रड, देवासूर संग्राम, सिध्देश्वर दशावतारी नाट्यमंडळ दोडामार्ग, राजा श्रीयाळ चांगुणा, वावळेश्वर दशावतारी नाट्यमंडळ तेंडोली, दिव्य शांभवी अवतार, आनंदी अनंत आना बागवे द. नाट्यमंडळ अणाव, राजा रूखमांगद अशी नाट्यमहोत्सवात सादर झालेले नाट्यप्रयोग आहेत.
आज सायंकाळी सोमवार दिनांक १७ एप्रिल २०१७ रोजी चेंदवणकर दशावतारी नाट्यमंडळ चेंदवण, पार्वती झाली मासेवाली, मंगळवार दिनांक १८एप्रिल २०१७ रोजी श्री. हेळेकर दशावतारी नाट्यमंडळ कारिवडे, शिवतीर्थ मलकापूर, बुधवार दिनांक १९ एप्रिल २०१७ रोजी श्री. हनुमान दशावतारी नाट्यमंडळ मांगेली, कंसजन्म, गुरूवार दिनांक २० एप्रिल २०१७ खानोलकर दशावतारी नाट्यमंडळ खानोली, प्रतिकृष्ण, शुक्रवार दिनांक २१ एप्रिल २०१७ श्री. देवीभराडी दशावतारी नाट्यमंडळ वाडीवरवडे, घट भरले पापाचे, शनिवार दिनांक २२ एप्रिल २०१७ रोजी श्री.गणेश भवानी दशावतारी नाट्यमंडळ हुंबरट, देव धावला हाकेला, रविवार दिनांक २३ एप्रिल २०१७ रोजी गुरूकृपा दशावतारी नाट्यमंडळ हळवल, रणसंग्राम हे दशावतारी नाट्यप्रयोग सादर होणार आहेत.
या स्पधेॅचा बक्षिस वितरण समारंभ सोमवार दिनांक २४ एप्रिल २०१७ रोजी सायंकाळी ६.00 वाजता श्री. देव रवळनाथ मंदिर, ओरोस बुद्रुक येथे होणार आहे. असे कामगार कल्याण मंडळाचे संतोष नेवरेकर यांनी सांगितले.